शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अभिनंदन करतं पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
मालवण : शिवसेना पक्षाच्या युवासेना मालवण तालुका चिटणीस पदी अमित विजय चव्हाण यांची नियुक्ती आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शननाखाली युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अमित चव्हाण यांचे अभिनंदन करतं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच युवसेना कार्याध्यक्ष श्री.पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शना खाली युवासेना जिल्हा प्रमुख संग्राम साळसकर यांनी नियुक्ती जाहीर करत अमित चव्हाण यांना नियुक्ती पत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख भाऊ चव्हाण, युवा सेना तालुका प्रमुख स्वप्नील गावडे, विभाग प्रमुख कमलेश प्रभु, उद्योजक पंकज वर्दम, वसंत गुरुजी, बबल नांदोडकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
वंदनीय हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस शुभेच्छा देत असल्याचे पत्र शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख संग्राम साळसकर यांनी दिले.
▪️अमित खोत | मालवण

