शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिल्या शुभेच्छा
शानू वालावलकर | मालवण : शिवसेना मालवण तालुका चिटणीस उद्योजक मकरंद राणे यांचा वाढदिवस शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी सभापती सुधीर साळसकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं असताना सर्वाना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करणे, जनसेवा करणे. यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे मकरंद राणे यांनी या निमित्ताने सांगितले.

▪️ अमित खोत, मालवण

