Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

नगरसेवक आरक्षण जाहीर ; मालवण नगरपरिषद

नगरसेवक आरक्षण जाहीर ; मालवण नगरपरिषद

20 पैकी 10 जागा महिला आरक्षित

प्रभाग 4 मध्ये अनुसूचित जाती आरक्षण

5 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षित

प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत

मालवण : मालवण नगरपरिषद दहा प्रभागातील २० जागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षणात काही विद्यमान नगरसेवकांना फटका बसला असून त्यांना अन्य प्रभागात संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अनेक ठिकाणी इच्छुक असलेल्या नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळणार असल्याचे चित्र आहे. एकूणच आरक्षण सोडत नंतर 'कही ख़ुशी कही गम' असे चित्र दिसून येत आहे.

ज्या प्रभागात अनुसूचित जातीची लोकसंख्या टक्केवारीनुसार जास्त आहे त्यानुसार प्रभाग चार मध्ये अनुसूचित जाती आरक्षण निश्चित करण्यात आले. याठिकाणी एक जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी आरक्षित करण्यात आली. तर दुसरी जागा महिला सर्वसाधारण (खुली) आरक्षित करण्यात आली आहे. मालवण नगराध्यक्ष आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) हे यापूर्वीच निश्चित झाले आहे.

मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, प्रभारी मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या उपस्थितीत टोपीवाला हायस्कूलच्या गौरी वस्त, देवयानी कुलकर्णी, अनिमिष पवार, अनुज चव्हाण या चार विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण काढण्यात आली. यावेळी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग १ अ : सर्वसाधारण (खुले), ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग २ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ३ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ४ अ : अनुसूचित जाती, ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ५ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ६ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ७ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ८ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ९ अ : सर्वसाधारण (खुले), ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १० अ : सर्वसाधारण (खुले), ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, भाजपा महिला शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, पंकज सादये, महेंद्र म्हाडगुत, पूजा करलकर, भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, भाजपा शहर सरचिटणीस महिमा मयेकर, शिवसेना जिल्हा संघटक अंजना सामंत, ठाकरे गट शहर प्रमुख बाबी जोगी, तपस्वी मयेकर, नरेश हुले यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom