Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

पाट हायस्कूलच्या सुयश पाटकर ची राज्यस्तरीय निवड चाचणीत निवड

पाट हायस्कूलच्या सुयश पाटकर ची  राज्यस्तरीय निवड चाचणीत निवड

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल १५ वर्षे वयोगट मुले व मुली चॅम्पियनशिप चाचणी

निलेश जोशी | कुडाळ : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय निवड चाचणीत कोल्हापुर विभागातून एस एल देसाई विद्यालय पाटच्या सुयश पाटकर या खेळाडूची निवड झाली.

आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारा वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल १५ वर्षे मुले व मुली चॅम्पियनशिप दिनांक ४ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत चीन देशामध्ये आयोजित होणार आहे. सदर स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असून भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय शालेय महासंघाने राष्ट्रीय निवड चाचणी आयोजन दिनांक १९ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी पुणे या ठिकाणी होणार आहे. या निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एस्. एल्. देसाई विद्यालय पाट विद्यालयातील खेळाडू कुमार सुयश सूर्यकांत पाटकर या खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

या खेळाडूस प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, क्रीडा शिक्षक- संजय पवार , दत्तात्रय कुबल व राष्ट्रीय खेळाडू रुपेश कोनकर , चारुहास वेंगुर्लेकर, अमित हर्डीकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत, संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर,सचिव विजय ठाकूर व सर्व संस्था पदाधिकारी व प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर,पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांच्यासह प्रशालेतील सर्व कर्मचारी वर्ग व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुयशचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

rapan bottom