Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ मध्ये डॉन बॉस्को चर्च इमारतीला आग

नागरिक आणि अग्निशमन बंब यांनी विझविली आग

कुडाळ : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नजीक असलेल्या डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या भागात आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला आग लागली. नागरिक तसेच कुडाळ न प आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबानी वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले आणि आग विझवली. या आगीत कोणतीही प्राणहानी झाली नसली तरी तिथे मोठ्या संख्येने असलेल्या प्लास्टिक खुर्च्या जळाल्याने नुकसान झालं आहे. शॉर्ट सर्किटने ही आग लागली असा अंदाज आहे.
कुडाळ शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर डॉन बॉस्को चर्चची इमारत आहे. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला फिरायला गेलेल्या पत्रकार समील जळवी यांना या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या भागातून मोठ्या प्रमाणात धूर येताना दिसला. त्यांनी लगेच आजूबाजूच्या नागरिकांना याची कल्पना दिली. नगर पंचायत आणि एमआयडीसी अग्निशमन यंत्रणाना कल्पना देण्यात आली.
इमारतीच्या प्रवेशद्वारच्या भागात इलेक्ट्रिक मीटर आहे. त्या मीटरच्या नजीकच असलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांना लागल्याने आगीचा मोठा भडका उडाला आणि आगीने पेट घेतला. समील जळवी यांनी सर्व नागरिकांना कल्पना दिल्याने. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान साधारण ७.२० वा. च्या दरम्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि कुडाळ नगर पंचायत अग्नीशामक बंब घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विझवली.
नागरिकांच्या आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही, पण सुमारे दीडशे प्लास्टिक खुर्च्या जळून गेल्या आहेत.
आग लागल्याची खबर समजताच यावेळी घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते संजय भोगटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार समिल जळवी, कुडाळ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, पप्पू नार्वेकर, श्री मळगावकर, श्री कोरगावकर तसेच कुडाळ नगरपंचायतचे कर्मचारी, निहाल फर्नांडिस आणि ईतर ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom