Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सोन्या-चांदीचा नारळ, सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ यासह विजेत्यांवर होणार बक्षिसांचा वर्षाव

सोन्या-चांदीचा नारळ, सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ यासह विजेत्यांवर होणार बक्षिसांचा वर्षाव

सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची भव्य दिव्य स्वरूपातील महिला सहभागतील नारळ लढवणे स्पर्धा…

कोकण प्रांतात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मानबिंदू असलेले स्वराज्य महिला ढोल ताशा पथकाच्या गजरात नारळी पौर्णिमा निमित्ताने मालवण बंदर जेटीवर स्पर्धेचा थरार…

मालवण : कोकणातील सर्वात मोठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हणून नावलौकिक प्राप्त भव्यदिव्य स्वरूपात आयोजित होणारी महिला नारळ लढवणे स्पर्धा सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्या वतीने नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण बंदर जेटी येथे गेली 10 वर्षे आयोजित केली जात आहे. सर्वाधिक बक्षीस रक्कमेची आणि हजारो स्पर्धक सहभागी असणारी ही रेकॉर्डब्रेक ठरली आहे. यावर्षी स्पर्धेचे हे अकरावे वर्ष असून भव्यदिव्य स्वरूपात ही स्पर्धा संपन्न होणार आहे. 8 ऑगस्ट सायं. ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे या स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकास स्पर्धेचे खास आकर्षण असलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ इरकल पैठणी यांसोबत विजेता चषक तसेच उपविजेत्या स्पर्धकास सोन्याची नथ, पैठणी यांसह चषक यासोबत तृतीय क्रमांक व दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना विशेष पारितोषिक, गृहपायोगी भेटवस्तू असा बक्षीसांचा वर्षाव होणार आहे.

या सोबत उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असून त्यात विशेष पारितोषिक असणार आहे. म्हणजेच स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही बक्षीस जिंकण्याची संधी असणार आहे. तर स्पर्धेत नाव नोंदणी करणाऱ्या पहिल्या 300 स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू असून उर्वरित स्पर्धकांना ही बक्षीस जिंकण्याची संधी असणार आहे. अशी माहिती स्पर्धेच्या सर्वेसर्वा सौ. शिल्पा यतीन खोत यांनी दिली आहे.

स्पर्धेत खास आकर्षण स्वरूपात झी मराठी गांव गाता गजाली फेम आर्टिस्ट यांचे 10 फुटी महाबली हनुमान असणार आहेत. जिल्हाच्या कला रत्नापैकी एक असलेले मालवणी निवेदक बादल चौधरी आणि अक्षय सातार्डेकर स्पर्धेचे निवेदन करणार आहेत.

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सर्वत्र महिला सहभागतील नारळ लढवणे स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित होत आहेत. मात्र 10 वर्षांपूर्वी सौ. शिल्पा यतीन खोत यांनी महिला भगिनींना या खेळातही स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे या हेतूने या स्पर्धेचे सर्वप्रथम आयोजन केले. विजेता उपविजेता यांवर सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव ठरणारी ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली गेली. स्पर्धा लक्षवेधी ठरली. मात्र शिल्पा खोत सांगतात मी निमित्तमात्र आहे. स्पर्धेचे श्रेय मालवण वासियांचे आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांचे आहे. या सर्वांनी ही स्पर्धा मोठी केली करतं आहेत. त्यामुळे ही स्पर्धा माझ्या मालवण वासियांची आहे, सिंधुदुर्ग वासियांची आहे. असे शिल्पा खोत यांनी सांगितले.

स्पर्धेच्या अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी
▪️शिल्पा खोत मोबा : 9422584641
▪️तन्वी भगत : 8104500843
▪️सायली कांबळी : 9137303370
▪️निकिता तोडणकर : 7588472876

यांच्याशी संपर्क साधवा. असे आवाहन शिल्पा यतीन खोत मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom