Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

प्रसाद मोरजकर यांनी बाबा मोंडकर यांना सुनावले…

प्रसाद मोरजकर यांनी बाबा मोंडकर यांना सुनावले…

दत्ता सामंत महायुतीत मिठाचा खडा टाकतात, म्हणण्यापेक्षा भाजप म्हणून आपण किती सक्षम आहोत,, याचा विचार करा….

बाबा मोंडकर व सहकाऱ्यांना माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांचा सल्ला

मालवण : भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना पदे दिली गेली, उबाठा मधील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपचे मालवण शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर व सहकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यावर केलेल्या टिके वरून माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दत्ता सामंत महायुतीत मिठाचा खडा टाकतात, म्हणण्यापेक्षा लोक त्यांच्याकडे का जातात, भाजप म्हणून तुम्ही किती सक्षम आहात, याचे या पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. दत्ता सामंत एखाद्या गावात गेल्यावर तेथील विकास कामांचा प्रश्न ग्रामस्थानी मांडल्यास अगर गावातील कोणी व्यक्ती आजारी असल्यास दत्ता सामंत आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून अथवा स्वतःच्या खिशातून त्यांना मदत करतात. पण हीच बाब भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली तर ते वरिष्ठांच्या कानावर घालतो, असं सांगून स्वतचे हात झटकतात. दत्ता सामंत शिवसेनेचा झेंडा घेऊनआज गावागावात पोहोचत असताना तुम्ही भाजप म्हणून किती गावात पोहोचला ? असा सवाल श्री. मोरजकर यांनी करत बाबा मोंडकर हे शहर मर्यादित नेतृत्व आहे, त्यांनी तालुक्याच्या राजकारणावरून केलेली टीका चुकीची आहे, असेही म्हटले आहे.

श्री. मोरजकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील काही पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन उभाठा कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला. यात शहरातील कोणीही नव्हते. त्यामुळे या बाबत तालुकाध्यक्षां नी प्रतिक्रिया दिली असती तर ते स्वाभाविक होते, पण शहर अध्यक्ष असलेल्या बाबा मोंडकर यांनी या विषयात बोलणे चुकीचे आहे. जे पदाधिकारी शिवसेनेत गेले असे तुम्हीं म्हणता त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला का ? ते कोणत्या कारणाने तुमची साथ सोडून गेले विचारले का ? त्यांना कोणती आमिषे दत्ता सामंत यांनी दिली ?… वास्तविक तुमच्या सोबत राहून गावातील विकास कामे होत नसतील तर ते इतरत्र न जाता महायुतीतीलच एका घटक पक्षात गेले तर चुकीचे काय ? शेवटी दोन्ही पक्षातील कार्यकते हे खासदार राणे साहेब यांचेच आहेत,

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात भाजपच्या वतीने रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. त्याचे निमंत्रण देखील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना दिले गेले नाही. तरीदेखील आम्ही काहीजण तेथे गेलो. येथे रक्तदान करणाऱ्यांना चहा, पोहे देण्यात आले. मात्र ग्रामीण भागातून या कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्त्यांना पिण्यासाठी पाणी पण दिले गेले नाही. या कार्यक्रमाला शहरातील २५ ते ३० कार्यकर्ते व ग्रामीण भागातील २५ ते ३० कार्यकर्ते उपस्थित होते. मग तुम्ही नेमलेले बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख राहिले कुठे याचा विचार करावा. तुम्ही पक्ष म्हणून किती लोकांपर्यंत पोहोचता ? असा सवाल प्रसाद मोरजकर यांनी केला आहे. खासदार नारायण राणेसाहेब निवडून येऊन सव्वा वर्षाचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत विकास कामांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी तुम्ही किती लोकांशी संपर्क केला ? उबाठा मधून अनेकांनी भाजपात प्रवेश केला, त्यांची एकदा तरी विचारपूस केली आहे का ? असा सवाल करून कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला स्वतःच्या मर्जीने पक्ष बदलण्याचा अधिकार आहे. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुती झाल्यास दोन्ही पक्षांना जे जागा मिळतील. त्या निवडून आणण्यासाठी दोघांनाही एकमेकांची गरज आहे. याचा विचार बाबा मोंडकर व सहकाऱ्यांनी करावा, तसेच या टिकेने खचून न जाता दत्ता सामंत यानी अधिक त्वेशाने आपले सामाजिक कार्य सुरु ठेवावे, कारण जिल्हा परिषद, व पंचायत समिती मधे 100% यश शिवसेना भाजपा ला मिळाले पाहिजे, ,असे प्रसाद मोरजकर यांनी म्हटले आहे.

rapan bottom