Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना महायुतीतील मित्रपक्षाकडून पक्षप्रवेशासाठी प्रलोभने…

भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांना पत्र

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारची महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या दिशेने घेवून जाणारी दैदिप्यमान वाटचाल सुरु आहे. तसेच आपल्या नेतृत्वाखाली भाजपा संघटनेची संपुर्ण राज्यभर घोडदौड सुरु आहे. आम्ही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळत आपल्या पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. खरतर जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असताना युतीच्या धोरणाप्रमाणे जिल्ह्यातील दोन मतदार संघामध्ये युतीतील सेना या पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी आपल्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेत जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांना चांगल्या मतांनी विजयी केले. महायुतीच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर संबंधित पक्षाच्या जबाबदार पदाधिकारी यांनी महायुती मधील समन्वय व्यवस्थित राखुन जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा योग्य तो आदर करणे अपेक्षित होते. परंतु कुडाळ- मालवण व सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच काही वरिष्ठ पदाधिकारी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विविध वैयक्तिक प्रलोभने तसेच स्थानिक पातळीवरील सार्वजनिक कामांची आश्वासने देत चुकीच्या कार्यपद्धतीने त्यांचा पक्ष प्रवेश घेत आहेत, पक्ष प्रवेशासाठी संपर्क साधत आहेत.

यापुर्वी अनेकदा अश्या प्रकाराबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांना महायुतीतील आचारसंहिते विषयी वरिष्ठामार्फत योग्य त्या सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु काही जबाबदार पदाधिकारी पुन्हा पुन्हा अश्या प्रकारचे वर्तन करत आहेत.

लवकरच राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत स्वप्न साकारण्यासाठी पार्लमेंट ते पंचायत तक आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक आहे. यासाठी महायुती मधील सहयोगी पक्ष यांच्याबरोबर समन्वय आणि संवाद गरजेचा आहे, अश्यावेळी स्थानिक पातळीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी हे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विविध प्रलोभने दाखवून स्वतःच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त करीत आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर महायुती मधील सेना व भाजपा या पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे, आणि त्याचा फायदा निश्चितच विरोधी पक्षाला होणार आहे.
जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन चांगल्या प्रकारे आहे. सेना (शिंदे) ज्याप्रमाणे भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घेत आहे, त्यापेक्षा दुप्पटीने आम्ही त्यांच्याकडे आता असलेल्या कार्यकर्त्यांचे प्रवेश घेऊ शकतो, कार्यकर्ते तयार आहेत, परंतु निवडणूक समोर असताना आमच्या वरिष्ठांची अडचण होता नये, आपका पक्ष मोठा आहे, आमच्याकडून युतीचा धर्म मोडता नये यासाठी आम्ही गप्प आहोत. सेनेच्या या धोरणामुळे आमच्या प्रत्येक मंडल आणि जिल्हा बैठकीत स्वबळाचा आग्रह कार्यकर्ते पोट तिडकीने मांडतात. त्यांना आवरणे सुद्धा दिवसेंदिवस कठीण होत आहे. यासाठी हा विषय अधिक गांभीर्याने विचारात घ्यावा.
आपणास विनंती आहे कि, मा. मुख्यमंत्री साहेब व आपण आपल्या स्तरावरून या विषयाची गंभीरतेने दखल घेवून संबंधित सेना पदाधिकारी यांना त्यांच्या पक्ष प्रमुख / वरिष्ठांमार्फत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. धन्यवाद !

असे पत्र भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर विजयसिंह सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांना पाठवले आहे.

rapan bottom