
दिल्ली : विकासपुरुष, राष्ट्रसेवक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीज यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच झालेली ही सदिच्छा भेट दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरली. असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून केलेल्या पक्षकार्याचा अहवाल यावेळी आदरणीय Narendra Modi जी यांच्या हाती सुपूर्द केला. तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यासंदर्भात आदरणीय मोदीजींकडून मार्गदर्शन लाभले. असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.


