Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

नामांकित भजनी बुवांचा "भजन महोत्सव"

घुमडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने २९ जुलैपासून घुमडाई मंदिरात श्रावणधारा महोत्सवा अंतर्गत आयोजन

उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत पुरस्कृत श्रावणधारा महोत्सवचे ११ वे वर्ष

मालवण : निसर्ग संपन्न घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात आयोजित श्रावणधारा महोत्सवा अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने २९ जुलै पासून भजनमहर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृतीप्रित्यर्थ नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे ११ वे वर्ष आहे. हा महोत्सव १९ ऑगस्ट पर्यंत असणार आहे.

मंगळवार २९ जुलै रोजी सकाळी ९ वा. धार्मिक कार्यक्रम, सायं. ७ वा. श्री सदगुरु संगीत भजन मंडळ, कुडाळ (बुवा वैभव सावंत), रात्रौ ८.३० वा. श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, परेल मुंबई (बुवा - दुर्वास गुरव), मंगळवार दि. ५ ऑगस्ट सकाळी ९ वा. धार्मिक कार्यक्रम व दुपारी १ वाजता - महाप्रसाद, सायं. ७ वा. श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, वडखोल वेंगुर्ले (बुवा - रूपेंद्र परब), रात्रौ ८.३० वा. श्री लिंग माऊली प्रासादिक भजन मंडळ, सांताक्रुज मुंबई (बुवा श्रीधर मुणगेकर), गुरुवार दि. ७ ऑगस्ट सायं. ७ वा. संयुक्त दशावतारांचा दणदणीत संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग "काशी भविष्यकथन" होणार आहे. यात कलाकार गणपती- दिलीप सुतार, ब्रम्हदेव - मामा माळकर, रिध्दी सिध्दी- भावेश तळासकर, पार्वती- गोट्या येरागी, इंद्र- केशव खांबल, नारद- चारु मांजरेकर, योगिनी - शिवा मेस्त्री, देवदास- नारायण आशियेकर, अनांग मोहिनी- सुधीर तांडेल, अग्नी- सागर गावकर, शंकर- दत्तप्रसाद शेणई, यमधर्म- उदय मोर्ये, गणपती- गौरव शिर्के, ज्योतिषी - संदेश वेंगुर्लेकर, ब्राम्हण- प्रथमेश सामंत, महाविष्णु - देवेंद्र कुडव, संगीत साथ - हार्मोनियम पप्पु घाडीगावकर, मृदंग पियुष खंदारे, तालरक्षक विनायक सावंत यांचा समावेश आहे. त्यांना विशेष सहाय्य - मामा माळकर पुरस्कृत बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ मालवण कोळंब (भटवाडी) यांनी केले आहे.

मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी सायं. ७ वा. श्री भुतनाथ प्रासादिक भजन मंडळ, वायरी मालवण, बुवा - भालचंद्र केळुसकर, रात्रौ ८.३० वा. श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ, भांडुप मुंबई. बुवा - भगवान लोकरे. गुरुवार दि. १४ ऑगस्ट सकाळी ८ वा. लघुरुद्र, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. संयुक्त दशावतारांचा दणदणीत संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग "कालचक्र" होणार आहे. यात कलाकार गणपती- काका कलिंगण, रिद्धी सिद्धी - योगेश वस्त, देवराज इंद्र- बबलु मेस्त्री, यमधर्म- दादा राणेकोनस्कर, राजा सुशील- विलास तेंडुलकर, राणी उर्वी- संजय लाड, अधमासूर - पिट्या दळवी, नारद सुभाष लोंडे, शंकर- उदय राणेकोनस्कर, राजकन्या धुती- यश जळवी, यती - उल्हास नाईक, ब्राम्हण- काका कलिंगण, माळी - सुधीर देवळी यांचा समावेश आहे. त्यांना संगितसाथ हार्मोनियम आशिष तवटे, मृदूंग चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण देणार आहेत. तर विशेष सहाय्य - लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर. यांचे लाभणार आहे.

मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. धार्मिक कार्यक्रम व दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायं. ७ वा. श्री वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ देवगड (बुवा संदीप लोके), रात्रौ ८.३० वा. श्री गंभिरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घाटकोपर मुंबई, (बुवा लक्ष्मण गुरव) यांची भजन सेवा होणार आहे. तरी भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ, घुमडे-मालवण यांनी केले आहे.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom