Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

तर बंदर जेटीवरील स्टॉल व अन्य सर्व विषयावर बोलावेच लागेल

तर बंदर जेटीवरील स्टॉल व अन्य सर्व विषयावर बोलावेच लागेल

सेजल परब यांना शिवसेनेत यायचे होते पण पक्ष प्रवेश कां झाला नाही ते ही मंदिरातच सांगतो

शिवसेना दांडी शाखा प्रमुख नरेश कोयंडे व सहकाऱ्यांनी बाबा मोंडकर व विकी तोरसकर यांना सुनावले

मालवण : आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे कोणतीही समस्या मांडल्यास ती तात्काळ सुटते. जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जात असल्याने शिवसेनेकडे जनतेचा ओढा वाढत आहे. जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यशस्वी ठरत आहेत. आमदार निलेश राणे ही दत्ता सामंत यांच्या कामाचे सातत्याने कौतुक करतं आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यशस्वी ठरत असल्याने बाबा मोंडकर, विकी तोरसकर यांच्या सारखे स्वयंघोषित नेते स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दत्ता सामंत यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करतं आहेत. मोंडकर, तोरसकर यांची पत्रकार परिषद स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आहे. मात्र यापुढे दत्ता सामंत यांच्यावर टिका करण्याचा प्रयत्न झाल्यास बंदर जेटीवरील स्टॉल व अन्य सर्व विषयावर बोलावेच लागेल. असा सूचक इशारा शिवसेना दांडी शाखा प्रमुख नरेश कोयंडे, मंगेश कोयंडे, अरुण तोडणकर, प्रवीण पराडकर, भाऊ मोरजे यांनी दिला.

तळाशील येथे समुद्री अतिक्रमणमुळे गावचे दोन भाग अशी स्थिती असताना हे स्वयांघोषित नेते कुठे होते? आतापर्यंत जनतेचे कुठले प्रश्न सोडवले हे जाहीर करावे. नुसतेच स्वतः नेते म्हणवून घेऊ नये.

सामंत साहेब जिल्हाप्रमुख असल्याने शिवसेना पक्ष वाढवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते काम प्रामाणिकपणे ते करतं आहेत. सोबत जनतेचे प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सोडवून जनसेवा करतं आहेत.

सामंत साहेब विकासकामांची आश्वासन देतात आणि आमदार नीलेश राणे साहेब ती पूर्ण करतात याला आमिष दाखवणे म्हणत नाही तर जनसेवा म्हणतात. मोंडकर सारख्या स्वयंघोषित राष्ट्रीय नेत्यांना हा विकास कधी समजला नाही. मोंडकर यांनी मालवण जेटी वर जो काही विकास केला तो आम्हाला बोलायला लावू नका.
स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सुरु असलेली बेताल वक्तव्ये थांबवा.

भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब, आमदार निलेश राणे साहेब यांच्या नेतृत्वात गतिमान विकास होत आहे. उबाठा गटातून अनेक पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे महायुती भक्कम होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यांचे राजकीय वजन वाढत आहे. असे असताना दत्ता सामंत साहेब नेहमीच सांगतात आम्ही राणे साहेबांचे कार्यकर्ते. त्यांचा निर्णय आम्हाला नेहमीच सर्वोच्च आहे. हीच दत्ता सामंत यांची निष्ठा आहे.

त्यामुळे डिपॉझिट जप्त झालेल्या व जिल्हापरिषद निवडणुकीत 500 मते पण मिळू न शकलेल्या मोंडकर यांनी बेताल बडबड थांबवावी.

तसेच विकी तोरसकर यांनीही खोटे बोलणे थांबवावे. सेजल परब या भाजपात जाण्या पूर्वी दत्ता सामंत यांना भेटल्या. आम्ही शिवसेनेत येतो पण आमच्या काही मागण्या आहेत त्या पुर्ण झाल्या पाहिजेत. अशी भुमिका त्यांची होती. मात्र आर्थिक मागणी मान्य न झाल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला. याबाबत विकी तोरसकर यांनी आम्हाला सविस्तर बोलायला लावू नये. किंबहुना हे खोटे असेल तर गावाच्या मंदिरात येऊन खरे स्पष्ट करावे.

दत्ता सामंत यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. तळाशील येथील बंधारा उभारणी रूपाने ते जनतेने पुन्हा अनुभवले, अनेक प्रसंगातून सातत्याने दिसन येते. आमदार निलेश राणे यांनी याबाबत कौतुक केले. त्यामुळे दत्ता सामंत यांचे उतुंग सामाजिक कार्य कोणीही कवेत घेऊ शकणार नाही. हे तोरसकर यांनी लक्षात घ्यावे व कवेत घेण्याची भाषा करावी.

बोलण्यासारखे खूप आहे. मात्र आम्हाला सय्यम ठेवून बोला ही शिकवण असल्याने. अधिक काही बोलत नाही.

rapan bottom