Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण | पहिले लेदर बॉल इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण नेट सुरू

मालवण | पहिले लेदर बॉल इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण नेट सुरू

पावसाळ्यातही खेळाडूंच्या सरावाला मिळणार संधी

जुबेर खान । मालवण : पावसाळ्याच्या दिवसांत लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षण थांबते, या समस्येवर मात करण्यासाठी आणि युवा खेळाडूंना वर्षभर सरावाची संधी मिळावी या उद्देशाने मालवण येथे पहिले लेदर बॉल इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण नेट सुरू करण्यात आले आहे. विनर्स स्पोर्ट्स अकॅडमी मालवणच्या वतीने संदीप पेडणेकर यांच्या मालवण, गवंडीवाडा येथील जागेत या अत्याधुनिक इनडोअर नेटचे उद्घाटन आज, रविवार, २७ जुलै रोजी पार पडले. अकॅडमीतील खेळाडूंच्या हस्ते फीत कापून आणि श्री. राजन परुळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या इनडोअर क्रिकेट नेटचे उदघाटन संपन्न झाला.

साधारणपणे लेदर बॉल क्रिकेटचा सराव खुल्या मैदानावर किंवा मैदानातील नेटमध्ये केला जातो. परंतु, पावसाळ्यातील चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत हा सराव पूर्णपणे थांबतो, ज्यामुळे खेळाडूंच्या प्रगतीत खंड पडतो. याच गोष्टीचा विचार करून विनर्स स्पोर्ट्स अकॅडमीने पुढाकार घेतला आणि या इनडोअर नेटची निर्मिती केली.

या प्रसंगी बोलताना विनर्स स्पोर्ट्स अकॅडमी मालवणचे प्रशिक्षक सुशील शेडगे यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "मालवणमधील हे पहिले इनडोअर क्रिकेट नेट आहे. लहान मुलांच्या प्रगतीसाठी आणि जिल्ह्यामध्ये, देशामध्ये किंवा राष्ट्रामध्ये आपले खेळाडू चमकले पाहिजेत या उद्देशाने आम्ही ही अकॅडमी सुरू केली आहे. ही अकॅडमी रेजिस्टर आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये मालवणमध्ये खेळाडू तयार करणे हा आमचा मुख्य उद्देश होता. पावसाळा सुरू झाला की क्रिकेटचा नेट बंद होतो आणि त्यामुळे मुलांची प्रॅक्टिस होत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि कुडाळ येथे इनडोअर क्रिकेट नेट उपलब्ध आहेत, त्यामुळे तिथल्या अंडर-१४ आणि अंडर-१७ संघांनी चांगली कामगिरी केली आहे. मालवणमध्ये सरावाची कमतरता असल्याने चांगले संघ आणि खेळाडू तयार होत नव्हते. हे चित्र बदलण्याच्या उद्देशानेच आम्ही या इनडोअर क्रिकेट नेटचे उद्घाटन केले आहे. याचा मालवण तालुक्यातील मुलांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा."

विनर्स स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू साईवेद मालवणकर यानेही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, "एक खेळाडू म्हणून पावसाळ्यात आम्हाला ज्या गोष्टीची आज गरज होती, ती म्हणजे इनडोअर क्रिकेट नेट. ही सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशिक्षक संदीप पेडणेकर आणि संपूर्ण विनर्स स्पोर्ट्स अकॅडमी मालवणचे मी आभार व्यक्त करतो."

विनर्स स्पोर्ट्स अकॅडमी मालवणचे प्रशिक्षक संदीप पेडणेकर, ज्ञानेश केळूसकर आणि सुशील शेडगे यांनी मालवण तालुक्यातील सर्व मुला-मुलींनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या इनडोअर नेटमुळे युवा खेळाडूंना वर्षभर सरावाची संधी मिळणार असून, त्यांच्या कौशल्यात सातत्य राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे मालवणमध्ये भविष्यात अधिक दर्जेदार क्रिकेटपटू निर्माण होतील आणि जिल्ह्याचे नाव उज्वल करतील अशी आशा आहे.

या उद्घाटनप्रसंगी श्री. राजन परुळेकर, सौं. संध्या परुळेकर, नितीन मांजरेकर, अण्णा कारेकर, रवी मालवणकर, सनी परुळेकर, मीनल परब, संतोष परब, विलास पेडणेकर, अश्विनी परुळेकर, रिजवान शेख, उमेश मांजरेकर, साईवेद मालवणकर, हेमंत शिरगावकर, गितेश मुणगेकर, पिंकू मोरे, छोटू तोडणकर, सुमन पेडणेकर, दादा मंडलिक, संजय परुळेकर, रोहित चव्हाण, मार्शल डिसोझा, आशा पेडणेकर, हनुमंत रेवंडकर, दिक्षा मालवणकर यांच्यासह अकॅडमीमधील सर्व खेळाडू आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या नव्या सुविधेमुळे मालवणमधील क्रिकेटला नक्कीच नवी दिशा मिळेल अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

rapan bottom