Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवणातील हृदयरोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवणातील हृदयरोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

जुबेर खान | मालवण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राणे हॉस्पिटल रिसर्च सेंटर, कुडाळ यांच्या सौजन्याने, डॉ. जी. टी. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर रविवार, २७ जुलै रोजी यशस्वीरित्या पार पडले.

शिबिराचे उद्घाटन डॉ. जी टी राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. राणे हॉस्पिटल रिसर्च सेंटर, कुडाळ येथील ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जी. टी. राणे यांचे स्वागत मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, शाखाप्रमुख (मेढा) बंड्या सरमळकर, हेमंत मोंडकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, महिला शहर संघटक रश्मी परुळेकर, नीना मुंमबरकर, विद्या फर्नांडिस, माधुरी प्रभू, मंदा जोशी, मोहन मराळ, महेश देसाई, प्रसाद चव्हाण, अन्वय प्रभू, राका रोगे, चिंतामणी मयेकर, युवतीसेना भाग्यश्री लाकडे खान, राहुल जाधव, रमेश कद्रेकर, प्रवीण लुडबे, वायरी सरपंच भगवान लुडबे, अक्षय भोसले, रुपेश प्रभू, युवासेना मसुरे विभागप्रमुख राहुल सावंत, सिद्धेश मांजरेकर, किशोर गावकर, शशिकांत शिंदे, प्रत्युष भोगले, महेश जावकर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराला मालवण तालुक्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराच्या चार तासांच्या कालावधीत अनेक नागरिकांनी आपल्या हृदयाची तपासणी करून घेतली. या आरोग्य शिबिरात डॉ. प्रियश्री कदम, अंजली शेणई, रोशन मुंबरकर, संतोष गुंजाळ या वैद्यकीय पथकाने तपासणीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांचे हे सहकार्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले हे आरोग्य शिबिर, समाजाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे आणि लोकसेवेच्या भावनेचे उत्तम उदाहरण ठरले. नागरिकांना मोफत हृदयरोग तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने, आरोग्यसेवेपासून वंचित असलेल्या अनेकांना याचा लाभ झाला. भविष्यातही अशाच प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करून, जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे.
या शिबिरामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याची संधी मिळाली आणि अनेक गरजू रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार घेण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.

rapan bottom