Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

करमळीवाडी आणि बिजोळेवाडी वाड्या आंदुर्ले विज केंद्राला जोडणार ; काम सुरु

करमळीवाडी आणि बिजोळेवाडी वाड्या आंदुर्ले विज केंद्राला जोडणार ; काम सुरु

माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या मागणीला यश

वालावल सरपंच अमृत देसाई यांची माहिती

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा-वालावल गावातील करमळीवाडी व बिजोळेवाडी या दोन वाड्या नेरुर विज केंद्रा ऐवजी आंदुर्ले विज केंद्राला जोडाव्यात म्हणजे वारंवार लाईट जाण्याचे प्रकार होणार नाहीत अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केली होती. या मागणीला यश येऊन विज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती हुमरमळा वालावल सरपंच अमृत देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री देसाई म्हणतात, हुमरमळा-वालावल गावातील करमळीवाडी,बिजोळेवाडी या दोन वाड्या झाडीने वेढलेल्या आणि दाटीवाटीने असल्याने लाईट जाण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच नेरुर केंद्राला या दोन वाड्या जोडल्याने लाईटचा लोड कदाचित जास्त असु शकतो. तसेच लाईट दोन ते तीन दिवस गायब असते. त्यामुळे लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असते.
यासाठी आमचे माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी गेली दोन वर्षे या मागणीचा पाठपुरावा आणि संबधित अधिकाऱ्यांबरोबर पाठपुरावा करत होते. त्यांच्या या मागणीला यश येऊन प्रत्यक्ष विज अधिकारी यांनी काम सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत या कामाला सुरुवात होऊन लाईटमुळे त्रस्त करमळीवाडी आणि बिजोळेवाडी येथील विज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, असे श्री देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

rapan bottom