Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम दत्ता सामंत करत आहेत

महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम दत्ता सामंत करत आहेत

मालवण भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांची पत्रकार परिषद

मालवण : भाजप कार्यकारिणीत पदावर कार्यरत पदाधिकारी यांना आमिष दाखवित मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश करून घेतले जात आहेत. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे प्रकार सुरू असून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. त्यांनी हे प्रकार बंद करावेत अन्यथा भाजप त्यांना जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान याबाबतची तक्रार आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री नितेश राणे यांसह वरिष्ठ नेत्यांकडे केली असून त्यांनी याची गंभीर दखल घेतली असल्याचेही श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले.

मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, पंकज सादये, महिला शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, सेजल परब, राणी पराडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. मोंडकर म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणूक ही भाजप व मित्रपक्षाने महायुतीच्या माध्यमातून लढविली. त्यातून देशात, राज्यात चांगले यशही मिळाले.

आपल्या या ठिकाणी भाजपा नेते नारायण राणे हे खासदार, नितेश राणे आमदार म्हणून तर महायुतीचे आमदार म्हणून निलेश राणे निवडून आले. गेल्या वर्षभरात महायुतीच्या माध्यमातून जो बॅकलॉग होता तो भरण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पण यात गेल्या काही दिवसांत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वेगवेगळी प्रलोभने, आश्वासने देत दोन्ही पक्ष एकच आहेत असे सांगून भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश घेत त्यांना नियुक्ती देण्याचा सपाटा लावला आहे. महायुतीच्या समन्वयासाठी ही चुकीची बाब आहे.
दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जे काही प्रकार सुरू केले आहेत. हे प्रकार थांबणे आवश्यक आहे. याबाबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सर्व माहिती पोचविण्यात येईल.

महायुती कलुषित करण्याचे काम ते करत असून भविष्यात याला ते जबाबदार राहणार आहेत असे श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले.
मित्रपक्षातील हा विषय समन्वयातून मिटावा अशी आमची अपेक्षा होती. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यांनी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना घ्यावे. मित्रपक्षातील कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही आणि जर असे होत असेल तर भाजपचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही. जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजप सक्षम आहे. सामंत यांनी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहाराध्यक्ष या तिन्ही पदांची कामे करत आपण वेगळे काहीतरी करत आहोत हे दाखवू नये.  महायुती म्हणून चांगले काम सुरू असताना जिल्हाध्यक्ष सामंत यांच्याकडून संकुचित वृत्तीचे काम सुरू आहे. आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघटनेतील संघटक म्हणून काम करावे. अशा प्रकारचा त्रास मित्रपक्षाला देऊ नये हीच सामंत यांच्याकडून अपेक्षा असल्याचेही श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले. विकी तोरसकर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

rapan bottom