मालवण : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या कु.आदित्य देवीदास हारगिले (इयत्ता पाचवी) याने ६८ टक्के गुण मिळवत शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ३७ वा क्रमांक प्राप्त केला. तसेच जवाहर नवोदय विद्यालय सांगेली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या निवड परीक्षेत तो उत्तीर्ण झाला.
आदित्य हारगिले याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, प्रशालेचे मुख्याध्यापक एच बी तिवले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत त्याचे अभिनंदन करण्यात आले.

