Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

राहुल बागवे यांची युवासेना जिल्हा सचिव पदी नियुक्ती

राहुल बागवे यांची युवासेना जिल्हा सचिव पदी नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांची माहिती

मालवण : युवासेना कुडाळ मालवण जिल्हा सचिव पदी मसुरे गावचे युवा नेतृत्व राहुल साईप्रसाद बागवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी त्यांना जबादारी दिली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते राहुल बागवे यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा देण्यात आल्या.

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना युवासेना मजबूत करणार. असा विश्वास कुडाळ मालवण युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा सचिव राहुल बागवे यांनी व्यक्त केला.

नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या विनंतीनुसार आपली शिवसेना नियुक्ती करण्यात येत आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपूर्वक. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकप्रमुख राजा गावडे, देवाबाग विभागप्रमुख मंदार लुडबे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, उपजिल्हाप्रमुख मिहीर राणे, तालुकाप्रमुख अभि लाड, योगेश परब, संदीप भोजणे, शानू वालावलकर, सुरज बिरमोळे, मंगेश साळसकर, भाऊ मोरजे, प्रसद जाधव यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom