शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांची माहिती
मालवण : युवासेना कुडाळ मालवण उपजिल्हाप्रमुख पदी असरोंडी गावचे युवा नेतृत्व मिहीर मकरंद राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना मालवण तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केली. युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी त्यांना बढती देत युवासेना उपजिल्हा प्रमुख पदाची जबादारी दिली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मिहीर राणे यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा देण्यात आल्या.

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना युवासेना मजबूत करणार. असा विश्वास कुडाळ मालवण युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख मिहीर राणे यांनी व्यक्त केला.
नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या विनंतीनुसार आपली शिवसेना नियुक्ती करण्यात येत आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपूर्वक. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकप्रमुख राजा गावडे, देवाबाग विभागप्रमुख मंदार लुडबे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, जिल्हा सचिव राहुल बागवे, तालुकाप्रमुख अभि लाड, योगेश परब, संदीप भोजणे, शानू वालावलकर, सुरज बिरमोळे, मंगेश साळसकर, भाऊ मोरजे, प्रसद जाधव यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
▪️ अमित खोत | मालवण

