Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कारगिल विजय दिनानिमित्त खारेपाट्यात गौरवमयी व्याख्यानाचे भव्य आयोजन

कारगिल विजय दिनानिमित्त खारेपाट्यात गौरवमयी व्याख्यानाचे भव्य आयोजन

वैभववाडी | प्रतिनिधी : भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करणारा कारगिल विजय दिवस निमित्ताने, खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एनसीसी विभाग, विद्यार्थी कल्याण समिती व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक उत्साही, प्रेरणादायी आणि राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पोलिस पाटील, शेजवली ग्राम श्री. प्रकाश शिंदे यांनी कारगिल युद्धातील रणसंग्राम, भारतीय जवानांचे पराक्रम, शौर्य आणि मातृभूमीवरील प्रेम याबद्दल सखोल आणि भावस्पर्शी मार्गदर्शन केले. त्यांच्या शब्दांनी उपस्थितांचे मन हेलावले आणि देशप्रेमाचे संजीवनी दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रेरणास्थान व कुशल प्रशासक प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांनी भूषवले. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा व कर्तव्यभावना जागवली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. वसीम सय्यद उपस्थित होते. त्यांनी आपले ज्वलंत आणि प्रेरणादायी विचार मांडताना विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे, सामाजिक बांधिलकीचे आणि सेवाभावी वृत्तीचे मोल पटवून दिले. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रम भारदस्त आणि स्मरणीय ठरला.
यावेळी एनएसएस विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रश्मी देसाई यांनी विद्यार्थ्यांना सेवा, शिस्त आणि नेतृत्वगुणांची गरज पटवून दिली, तर प्रा. तानाजी गोदडे यांनी देशरक्षणासाठी युवकांची भूमिका स्पष्ट करत कर्तव्यपरायणतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक कुमारी सिद्धी शेलार हिने केले. आपल्या ओघवत्या आणि आत्मीय शैलीत तिने कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. सूत्रसंचालन कुमार प्रथमेश हरियाण याने आत्मविश्वासाने पार पाडले आणि कार्यक्रमाची उंची वाढवली. यानंतर कुमारी पवार हिने मनःपूर्वक आभार प्रदर्शन केले.
या प्रेरणादायी कार्यक्रमास महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसी, सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी कल्याण समितीचे समन्वयक, स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने, जवानांच्या अमर शौर्याला वंदन करून राष्ट्रसेवेची नवी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली, ही या कार्यक्रमाची जमेची बाजू ठरली.

rapan bottom