शिवसेना शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद प्रशासनाचे वेधले लक्ष
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील खड्डेमय रस्ते, रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी, बंद स्ट्रीट लाईट व हायमास्ट टॉवर यांसह विविध प्रश्नी शिवसेना शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता सावंतवाडी तसेच मुख्याधिकारी मालवण नगरपरिषद यांचे लक्ष वेधले.
आमदार निलेश राणे जनतेला अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोठया प्रमाणात विकासनिधी आणत आहेत. जन हिताच्या दृष्टीने नवनवीन विकासकामे होत आहेत. त्यामुळे जनतेला कोणताही त्रास होता नये तत्पर सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत यावर त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात अनेक मंदिरात होणारे उत्सव तसेच आगामी गणेशोत्सव लक्षात घेता लवकरात लवकर सूचित केलेली कामे पुर्ण करावीत. असे दिपक पाटकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मालवण कसाल मार्ग, मालवण सागरी मार्ग तसेच मालवण शहरातील ज्या मार्गांवर खड्डे आहेत ते योग्य पद्धतीने बुजवावेत. वाहतूकिस अडथळा ठरणारी रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोंडणे. याबाबत निवेदन बांधकाम विभागास देण्यात आले आहे. तर नगरपरिषद मुख्याध्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मालवण शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे. बंद स्ट्रीट लाईट, हायमस्ट दुरुस्ती करणे, सिमेंट पायवाटावर जमा झालेला शेवाळ ब्लिचिंग पावडर टाकून व साफसफाई करून दूर करणे. गणेश घाट ठिकाणी व्यवस्था करणे, वाहतूक व पार्किंग बाबत नियोजन करणे. वरील सर्व बाबी प्रशासनाने वेळेत पुर्ण करून घ्याव्यात. जनसेवेच्या कामातh कोणतेही सहकार्य लागल्यास आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तत्पर असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.

