मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीसह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांची माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीसह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

