आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र
मालवण | प्रतिनिधी : पेंडूर जिल्हा परिषद शिवसेना उप विभागप्रमुख पदी तळगाव येथील संतोष उर्फ बाळा पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वराड पंचायत समिती जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्तीपत्र दिले. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी बाळा पेडणेकर यांचे अभिनंदन करतं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघ पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.

सदर नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल.वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, जिप माजी वित्त बांधकाम सभापती संतोष साटविलकर, उपतालुकाप्रमुख आतिक शेख, विभाग प्रमुख राजन माणगांवकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, दादा नाईक, प्रताप चव्हाण, मंदार लुडबे, महेश परब यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
▪️अमित खोत, मालवण

