मालवण : गेले काही दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पडझडीच्या घटना घडत आहेत. मालवण तालुक्यातील राठीवडे गांगेश्वर मंदिराजवळील एमडीआर रस्तालगत सरंक्षक भिंत कोसळली. रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे.
याबाबत माहिती मिळताच जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, सरपंच सौ. दिव्या धुरी उपसरपंच स्वप्नील पुजारे, राजेश तांबे, संतोष धुरी, ज्युनिअर इंजीनअर भोई यांनी पाहाणी केली.
पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून संरक्षक भिंत पुन्हा उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याचे महेंद्र चव्हाण, राजू परुळेकर यांनी सांगितले. तसेच घटनेची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांना ही देण्यात आल्याचे महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

