Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने विदयार्थ्यांसाठी कुडाळमधून थेट बससेवा

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने विदयार्थ्यांसाठी कुडाळमधून थेट बससेवा

विद्यार्थी - विद्यार्थिनींची गैरसोय टाळण्यासाठी उपक्रम;

संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते शुभारंभ;

माजी जिप अध्यक्ष अशोक सावंत यांची प्रमुख उपस्थिती

कुडाळ : विद्यार्थी - विद्यार्थिनींची शैक्षणिक गैरसोय टाळून त्यांना सुलभ प्रवास करता यावा या उद्देशाने सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम (MITM) इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने मालवण नंतर आता कुडाळ तालुक्यातूनही थेट बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बस सेवेचा शुभारंभ आज शुक्रवारी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

ओरोस रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जिल्ह्यातील मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांना शासनाच्या निकषप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जात असून विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जात आहे. येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनींना एसटी प्रवासात होणारी अडचण लक्षात घेऊन कॉलेजच्या वतीने काही दिवसांपूर्वी मालवण ते कॉलेज पर्यंत बस सेवा सुरु करण्यात आली होती. त्यानंतर आज कुडाळ तालुक्यातूनही बस सेवा सुरु करण्यात आली. या बस सेवेचा शुभारंभ शुक्रवारी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, बाबा कुमठेकर, मोहन कुबल, देवेंद्र धोंड, निखिल तेंडुलकर, निलेश वेगुर्लेकर, भाग्यलक्ष्मी नाईक, भिकाजी जाधव आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील अन्य भागातून देखील विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता भासल्यास अशा प्रकारे बस सेवा सुरु करणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांनी दिली आहे.

rapan bottom