सिंधुदुर्ग : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच दिल्ली येथे भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली.
"महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृह व सहकार मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अमितभाई शाह यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राष्ट्र व महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने विविध विषयांवर सखोल चर्चा झाली."
या भेटीमध्ये 'राष्ट्र आणि महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने विविध विषयांवर सखोल चर्चा' झाली.
रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप महाराष्ट्रात आपली पकड अधिक मजबूत करेल आणि राज्याच्या विकासासाठी अधिक सक्रिय भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

