Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

खड्डे बुजवा, नाहीतर घंटानाद आंदोलन !

खड्डे बुजवा, नाहीतर घंटानाद आंदोलन !

कुडाळ मनसेचा बांधकाम विभागाला इशारा

पंधरा दिवसात खड्डे बुजविण्याची मागणी

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवावे, अशी मागणी मनसे कुडाळ तालुक्याच्या वतीने बांधकाम विभागाकडे उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांनी केली आहे. त्या आशयाचे निवेदन त्यांनी बांधकाम विभागाकडे दिले. पंधरा दिवसात खड्डे बुजवले नाही तर बांधकाम विभागा समोर घंटानाद आंदोलन करू असा इशाराच मनसे तर्फे देण्यात आला आहे.
कुडाळ तालुक्यातील मालवण रस्ता, पिंगुळी संत राऊळ महाराज मठ रस्ता हे व इतर प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी बुजविण्यात यावेत, यासाठी बांधकाम विभाग कुडाळ यांना भेटून मनसेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात ठेकेदारांनी केलेले रस्ते जोखीम कालावधीमध्ये आहेत त्यांना लेखी सूचना देऊन खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले बांधकामचे अधिकारी यांनी गणेश चतुर्थीपूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन मनसैनिकांना दिले. यावर पुढील पंधरा ते वीस दिवसात खड्डे न बुजवल्यास मनसेतर्फे बांधकाम कार्यालय कुडाळ येथे घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी निवेदन देताना उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, वाहतूक सेनेचे विजय जांभळे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर तथा राजवर्धेकर आदी उपस्थित होते.

rapan bottom