Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

फ्लाय९१ ने प्रादेशिक प्रवास आणि आदरातिथ्य सुलभ होणार

फ्लाय९१ ने प्रादेशिक प्रवास आणि आदरातिथ्य सुलभ होणार

फ्लाय९१ आणि सरोवर हॉटेल्स यांच्यात महत्वाचा करार

निलेश जोशी | कुडाळ : फ्लाय९१ आणि सरोवर हॉटेल्स यांनी प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाची भागीदारी जाहीर केली आहे. भारताची प्रामुख्याने प्रादेशिक सेवा देणारी विमान कंपनी आणि देशातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी साखळी एकत्र आल्याने प्रवाशांना आता प्रवास आणि वास्तव्यासाठी सवलतीसह अधिक सुसंगत आणि समृद्ध अनुभव मिळणार आहे. फ्लाय९१ चिपी विमानतळावरून पुणे, बंगलोर, हैदराबाद साठी सेवा देते. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हि चांगली बातमी आहे.
या कराराअंतर्गत, फ्लाय९१च्या प्रवाशांना गोवा, सिंधुदुर्ग, पुणे, बंगलोर, हैदराबाद आणि सोलापूर येथील सरोवर हॉटेल्समध्ये रूम बुकिंग आणि खाद्यपदार्थांवर २०% विशेष सवलत मिळणार आहे. SAROVARFLY91 हा कोड वापरून सरोवर हॉटेल्सच्या वेबसाइटवर किंवा कॉल सेंटरवर थेट बुकिंग करताना सवलत मिळेल. ही सवलत ग्राह्य धरण्यासाठी फ्लाय९१ चे बोर्डिंग पास दाखवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, सरोवर हॉटेल्सच्या पाहुण्यांना फ्लाय९१ च्या कोणत्याही मार्गावरील बेस भाड्यांवर १०% सवलत दिली जाईल. ही ऑफर फ्लाय९१ आणि सरोवरच्या अधिकृत वेबसाइट्सवर उपलब्ध असेल.
प्रवाशांना सोयीसुविधांनी समृद्ध अनुभव देण्याच्या आमच्या सामायिक दृष्टिकोनाचे हे प्रतिक आहे, असे सरोवर हॉटेल्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष (व्यावसायिक) अक्षय थुसो यांनी या कराराबद्दल बोलताना सांगितले. हॉटेल सेवा आणि प्रादेशिक विमानसेवा एकत्र आल्यामुळे प्रवाशांचा अनुभव आणखी चांगला होणार आहे आणि भारतातील नवीन पर्यटन स्थळांचा विकास होण्यास मदत होईल.
फ्लाय९१ ही कंपनी भारतात लास्ट माईल काँनेक्टिव्हीटी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. भारताच्या आर्थिक परिवर्तनात भाग घेण्याच्या आमच्या प्रयत्नात, आम्ही सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुलभ हवाई प्रवास प्रदान करत आहोत. हे सहकार्य त्या समान उद्दिष्टांची पूर्ती करत आहे,” असे फ्लाय९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले.
फ्लाय९१आणि सरोवर हॉटेल्सने एकत्रितपणे हा उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामध्ये डिजिटल प्रचार आणि संयुक्त प्रचारसामग्रीचा समावेश आहे. यामधून या विशेष ऑफरबद्दल जागरूकता वाढवण्यास आणि अधिकाधिक प्रवाशांना याचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करण्यास मदत होईल.

rapan bottom