Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बागवे हायस्कुल मसूरे येथे जिल्हास्तरीय वार्षिक गुणगौरव व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

बागवे हायस्कुल मसूरे येथे जिल्हास्तरीय वार्षिक गुणगौरव व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

संजय माने | पोईप : जिल्ह्यातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा या संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. राणे साहेबांचे या जिल्ह्यात आगमन झाल्या नंतर त्यांनी शिक्षणावर जास्त लक्ष दिल्याने शंभर टक्के निकालातून यश लाभते आहे. प्रत्येक शाळेने यशस्वी विध्यार्थी पुढे काय करतायत याची माहिती ठेवणे आवश्यक आहे. विध्यार्थ्यानी शाळेप्रति आपली बांधिलकी जपली पाहिजे. दानशूर व्यक्तिमत्व उद्योजक डॉ दीपक परब यांचा आदर्श विध्यार्थ्यानी घ्यावा. या भागात रोजगार निर्माण होण्यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमीच राहिले आहेत. मुलांनी थोर पुरुषांची पुस्तके वाचावीत. राणे साहेबांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण करण्यात मी कधी कमी पडलो नाही. आयुष्य भर आपल्यापेक्षा यशस्वी आणि हुशार लोकांची संगत करा ही राणे साहेबांची शिकवण विध्यार्थ्यानी सुद्धा आचरणात आणावी असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांनी मसूरे येथे केले.
मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई, लोकल कमिटी मसुरे आयोजित कै. मदन राजाराम बागवे शिक्षण निधी योजना व संस्थेकडे दानशूर दात्यांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याजातून सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनार्थ जिल्हास्तरीय वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. तांत्रिक विद्यालय शिक्षक श्री. नामदेव जाधव यांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या.


या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण मुळीक परब, शिवसेना मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख संग्राम साळसकर, माजी सभापती सुधीर साळसकर, मुंबई कार्यकारिणी उपाध्यक्ष उत्तम राणे, शालेय समिती अध्यक्ष सौ सरोज परब, लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, प्रभारी मुख्याध्यापिका सौ अर्चना कोदे, भरतगड हायस्कूल प्रभारी मुख्या. एस. आर. कांबळे, विठ्ठल लाकम, उद्योजिक सौ राधिका परब, विलास मेस्त्री, आप्पा परब, डॉ अनिरुद्ध मेहेंदळे, डॉ विणा मेहेंदळे, पंडित नाचणकर, बाळू परब, उपस्थित होते.
यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले, केलेली मदत कुणाला सांगत नाहीत असे सरळ स्वभावाचे अध्यक्ष डॉ. दीपक परब आपल्याला लाभले आहेत. मसुरे गावाच्या नावाची ओळख कायम रहावी या बद्दल त्यांची मागणी राणे परिवारापर्यंत निश्चित पोहोचवीन.स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर अभ्यास करा. आमदार निलेश रणे यांच्या माध्यमातून परीक्षेसाठी आवश्यक पुस्तकांची उपलब्धता आगामी काळात करण्यात येणार आहे. चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करा. शिक्षकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवावा.छोटी छोटी कर्ज घेऊन व्यवसायात उतरा. यातून यशस्वी उधोजक निर्माण होतील असे ते म्हणाले. यावेळी उद्योजक दत्ता सामंत, मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, युवासेना जिल्हाध्यक्ष संग्राम साळसकर, नीट परीक्षेतील गुणवंत कु. विक्रम मेहेंदळे, इन्कम टॅक्स अधिकारी विशाल जाधव यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष डॉ दीपक परब म्हणाले, शाळांचे विध्यार्थी कमी होत आहेत. डोंगरी भाग म्हणून वेगळे निकष या जिल्ह्यासाठी लावणे गरजेचे आहे. उद्योजक दत्ता सामंत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले ही संस्थेसाठी भाग्याची गोष्ट आहे. माजी विध्यार्थ्यानी या संस्थेचे सभासद व्हावे. मसूरे गावच्या नावाची ओळख कायम रहावी यासाठी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलावी लागणार आहे. भविष्यात मसुरे ग्रामपंचायतीचे प्रशासनाच्या चुकीमुळे बदललेले मर्डे नावा ऐवजी पूर्वीसारखे मसुरे नाव झालेच पाहिजे सर्वांनी यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. सामंत साहेब यांनी याबाबत अधिकारी वर्गाला समजावावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी स्थानिक कमिटीचे अध्यक्ष राजन परब म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बक्षीसे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना देणारी ही एकमेव संस्था आहे आणि या संस्थेमार्फत नेहमीच सर्व क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव केला जातो. मिळालेल्या संधीचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून आपल्या भूमीचे आपल्या पालकांचे आणि शाळेचे नाव उज्वल करावे.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष सौ. सरोज परब, राजन परब, विठ्ठल लाकम, नामदेव जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण बागवे, शिवाजी परब, पपू मुळीक, श्री दिलीप परब, सोमाजी परब, पंढरीनाथ नाचणकर, सौ संगीता जाधव, सुनिल बांदेकर, शशांक पिंगुळकर, भरत ठाकूर, रमेश पाताडे, शहाजी चौगुले, समीर नाईक, विवा तळाशिलकर, सौ भोगले, भानुदास परब, दयानंद पेडणेकर, अनिल मेस्त्री, श्री राणे, श्री. चरणदास फुकट, नरेंद्र हिंदळेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन भरत ठाकूर तर आभार एस आर कांबळे यांनी मानले. प्रास्ताविक अर्चना कोदे यांनी केले.

rapan bottom