कुडाळ मालवण विकास आराखडा मागील १० वर्षात २०० कोटीच्या वर गेला नाही तो या वर्षी १२०० कोटी प्रस्तावित
१७ वीज सबस्टेशन होणार ; वीज समस्या प्राधान्याने सुटणार
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण-कुडाळ विकासात गतिमान
मसुरे : मागील दहा वर्षे हा मतदारसंघ विकासाकामात मागे पडला. निधीच नाही, बजेट मधून तर पैसेच आले नाहीत. मात्र आता विकास थांबणार नाही. बजेट मधून यावर्षी सर्वाधिक विकासनिधी येणार. कुडाळ मालवण विकास आराखडा 200 कोटीच्या वर मागील दहा वर्षात गेला नाही तो या वर्षी 1200 कोटी प्रस्तावित आहे. वीज सब स्टेशनं चार वरून 17 होणार. मालवण कुडाळचे वीज प्रश्न प्राधान्याने सुटणार आहेत. विकासकामांना शेकडो कोटी निधी येत राहील. मालवण कुडाळ विकासात अग्रेसर ठेवणे हा आपला प्रधान्यक्रम राहील. असे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
आमदार निलेश राणे यांच्या प्रत्येक कृतीतून विकासाचे व्हिजन स्पष्ट होत आहे... विधानसभेत, मंत्रालय स्तरावरून निधी खेचून आणण्याची धमक आणि क्षमता असलेले हे नेतृत्व आपल्या कार्यातून कर्तृत्व सिद्ध करतं आहे.
रस्ते विकास, पूल साकवं, बंधारे यासोबत शाश्वत विकास नव्या संकल्पना, रोजगार निर्मिती, असे विकासाचे व्हिजन आमदार निलेश राणे यांच्या कार्यातून दिसून स्पष्ट होत आहे.

बजेट मधून यावर्षी सर्वाधिक विकासनिधी
