केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी यांनी घेतली भेट
दिल्ली : दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, गणपती स्पेशल रेल्वेगाड्या सोडाव्यात अशी महत्त्वपूर्ण मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणवासीयांचा प्रवास सुखकर आणि सुलभ होण्यासाठी हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह ठरेल !

