Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

गांजा बाळगल्या प्रकरणी विशाल सुरेश वाडेकर यास जामीन मंजूर

गांजा बाळगल्या प्रकरणी विशाल सुरेश वाडेकर यास जामीन मंजूर

ॲड. अशपाक शेख आणि ॲड. किशोर वरक यांचा युक्तिवाद

निलेश जोशी | कुडाळ : गांजा बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कुडाळ येथील विशाल सुरेश वाडेकर याला आज जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी ५० हजार रुपये रकमेच्या जातमुचलक्यावर व अटी शर्तीवर जामिनावर सोडण्याचा आदेश केला. संशयितांच्या वतीने ॲड. अशपाक शेख, ॲड.किशोर वरक, ॲड. नामदेव मठकर, ॲड.पंकज खरवडे , ॲड. विनय रजपूत यांनी काम पाहिले.
याबाबत ऍड. किशोर वरक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, विशाल वाडेकर यास कुडाळ पोलिसांनी गांजा प्रकरणी अटक केल्यानंतर अन्य दोन आरोपींनाही अटक करण्यात आले होते. आरोपी विशाल वाडेकर याच्यावतीने युक्तिवाद करताना, आरोपीकडून पोलिसांनी कधीही गांजा जप्त केला नसून प्रथम खबरी नुसार त्याच्याकडून बिया जप्त केल्याचे निदर्शनास येत असल्याने तसेच "गांजा बिया" या नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याप्रमाणे गांजाच्या व्याख्येत बसत नसल्याने पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवला आहे, असा युक्तिवाद केला . तो युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानला आणि संशयित आरोपीची काही अटी शर्तीवर जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

rapan bottom