Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

शिक्षक समितीचा वर्धापन दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा

शिक्षक समितीचा वर्धापन दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
२२ जुलै रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका शाखा सावंतवाडी तर्फे रक्तदान शिबीर व शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तालुका शाखा कणकवलीने संघटनेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न केले तसेच संस्थापक भा.वा.शिंपी गुरुजी व जॉन दियोग रॉड्रीग्ज गुरुजी यांचे प्रतिमापूजन आणि कातकरी समाज वस्तीतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तालुका शाखा कुडाळ मार्फत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सेवानिवृत्त शिक्षकांचा शुभेच्छा सोहळा संपन्न झाला.तसेच संस्थापकांच्या प्रतिमापूजन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.तालुका मालवण शाखा तर्फे संस्थापकांच्या प्रतिमपूजन संपन्न केले तर सभासद पाल्यांचा गुण गौरव कार्यक्रम आयोजित केला आहे.
तालुका वैभववाडी शाखेने
स्थापना दिन निमित्त रक्तदान शिबिर घेतले. तसेच ग्रामीण रुग्णालय वैभववाडी व उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
तालुका वेंगुर्ला शाखेने प्रतिमा पूजन,सभासद नोंदणी व संपर्क अभियान व वृक्षारोपण असे उपक्रम राबविले.दोडामार्ग तालुका शाखेने प्रतिमा पूजन,
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय मधील रुग्णांना फळे वाटप व
सभासद नोंदणी उपक्रम पार पाडले.देवगड तालुका शाखेने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न केला.
अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यात शिक्षक समितीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी दिली.

rapan bottom