Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

अवैध वाळु विषय नविन कायद्याची कडक अंमलबजावणी त्वरित करा

अवैध वाळु विषय नविन कायद्याची कडक अंमलबजावणी त्वरित करा

मनसे पदाधिकाऱ्यांचे प्रांत अधिकारी यांना निवेदन

निलेश जोशी | कुडाळ : अवैध वाळु  विषय नविन  कायद्याची कडक अंमलबजावणी त्वरित  करा, अशी मागणी मनसे पदाधिकारी यांनी कुडाळच्या प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
  प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अवैध वाळु उपसा व वाहतूकी बाबत शासन नेहमीच करवाई करित असते. परंतु काही वाळु व्यावसायिक  अवैध वाळु उत्खननातून पैशाने गब्बर झाले असल्याचे दिसुन येते. पावसाळ्यात रस्ते खराब होत आहेत.  या कारणाने पावसाळ्यात तरी निदान अवैध वाळु वाहतूक बंद ठेवण्याची ग्रामस्थाकडुन विनंती केली तरी, पैशाच्या जोरावर, प्रशासन आपले काही करु शकत नाही, अशा अविर्भावात पावसाळ्यात देखील वाहतूक, उत्खनन बंद ठेवण्यास तयार नाहीत.
   कायद्याचा धाक नसल्याने हा उन्मत्तपणा वाढला असून यावर लगाम घालण्याकरीता नवीन कायद्याची कडक अंबलबजावणी करण्यात यावी. जेणे करुन यावर आळा घालता येईल. असे निवेदनात म्हटले आहे.
    मनसे उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांच्या नेतृत्वाखालील आज प्रांत यांची भेट घेण्यात आली. यावेळेस मनविसे तालुकाध्यक्ष यतिन माजगावकर,  सुशांत परब, विष्णू मस्के ,जितू नेवगी उपस्थित  होते.

rapan bottom