Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

जिल्ह्यामध्ये लवकरच  भजन सदन उभारणार !

जिल्ह्यामध्ये लवकरच  भजन सदन उभारणार !

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

पालकमंत्र्यांच्या हस्ते कुडाळ मध्ये भजन स्पर्धेचे उदघाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन


निलेश जोशी | कुडाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भजनी कलाकार संस्थेच्या वतीने जी भजन स्पर्धा आयोजित केली आहे ती खरोखरच अभिमानास्पद आहे. असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजन सदन उभे राहील आणि पुढच्या वर्षाची भजन स्पर्धा ही त्या भवनात होईल, अशी ग्वाही दिली.
   सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि भजनी कलाकार संस्थेच्या वतीने कुडाळ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन महालक्ष्मी हॉल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भजनी कलाकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष बुवा संतोष कानडे, सुरेश सावंत, कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ज्येष्ठ भजनी बुवा श्री परब, मोहन सावंत, ज्येष्ठ भजनी बुवा श्री पारकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस केक कापून  साजरा करण्यात आला.
   या भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नितेश राणे म्हणाले, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही भजन स्पर्धा आयोजित केली हे खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. आपल्या भजन संस्कृतीमुळे अजूनही हिंदुत्ववाद टिकून आहे. त्यामुळे आपल्या भजन संस्कृतीला राजयोग मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे त्यांना भजन संस्कृती बद्दल माहिती आहे. लवकरच भजनी बुवांसाठी राजाश्रय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांना ज्या पद्धतीचे आमच्याकडून काम अपेक्षित आहे ते आम्ही महायुती म्हणून करून दाखवणार आहोत. भजनाच्या माध्यमातून आपल्या देवदेवतांच्या महतीचा प्रचार आणि प्रसार होत असतो, त्यामुळे ही भजन संस्कृती आम्हाला सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन सदन उभारण्यात येईल आणि पुढच्या वर्षीची भजन स्पर्धा ही त्या सदनामध्ये घेण्यात येईल असे पालकमंत्री नितेश राणे यांनी भजनी कलाकारांना आश्वासित केले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी मानले.

rapan bottom