शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांच्या वाढदिवसाचे औचित्य
मालवण : शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांच्या ६ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसा निमित्त शिवसेना आडवली मालडी जि.प. विभाग यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन सकाळी 7 ते 12 या वेळेत महात्मा गांधी विद्यालय, जि. प. शाळा श्रावण येथे आयोजित करण्यात आले आहे.
अशी माहिती शिवसेना तालुका प्रवक्ते निलेश बाईत यांनी दिली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दिवसभर सेवाभावी दृष्टीने सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. तर रात्री जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थित विनायक बाईत यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.
यावेळी आडवली मालडी जि. प. विभागातील विनायक बाईत मित्रमंडळ सदस्य तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्या दृष्टीने नियोजन बैठक प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी तालूका प्रवक्ते निलेश बाईत, युवा उद्योजक सुशांत सुनिल घाडीगांवकर, सुनिल घाडीगांवकर, प्रशांत परब, नंदु आंगणे, प्रकाश कासले, वैभव पारकर, मंगेश यादव, विजय गवळी, अरविंद साटम, स्वप्निल दळवी, संजय आडवलकर, (सरपंच) विष्णु घाडीगांवकर, विनोद साटम, भगवान लाड, भार्गव लाड, सागर घाडीगांवकर, विनोद भावे, शिवराम परब, दिपक अन्य शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*शिवसेना नंबर 1 हेच लक्ष*
आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात शिवसेना पक्ष संघटना म्हणून आडवली मालडी भक्कम आणि एकसंघ असलेला मतदारसंघ ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
▪️ अमित खोत, मालवण

शिवसेना आडवली मालडी विभागाच्या वतीने 6 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
