मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन
भाजपा मच्छिमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक विकी तोरसकर यांची माहिती
जुबेर खान | मालवण : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सीआरझेड (CRZ) कायद्यामुळे बाधित होत असलेल्या मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक आणि रहिवाशांसाठी काहीसा दिलासा मिळणार असण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील बांधकामांबाबत केंद्र व राज्य शासनाकडून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. अशी माहिती भाजपा मच्छिमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक विकी तोरसकर यांनी दिली आहे.
मालवण किनारपट्टी भागातील नागरिकांनी मंत्री नितेश राणे यांची कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले असल्याचे भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी सांगितले आहे.
सीआरझेडच्या अडचणींवर तोडगा निघावा यासाठी मालवणमधील माजी नगरसेविका सौ. सेजल परब आणि श्रमिक मच्छीमार संघटनेचे सन्मेश परब यांनी रविकिरण तोरसकर यांच्या समवेत मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी प्रशासनाने सीआरझेड कायद्यांतर्गत बजावलेल्या नोटिसा आणि त्यामुळे किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय, पर्यटन व्यवसाय तसेच निवासी घरांना भेडसावणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली.
मंत्री राणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले की, हा प्रश्न केवळ मालवणपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लागू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय लवकरच अपेक्षित आहे. विशेषतः, पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीत सीआरझेड कायद्यामुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठीही मार्ग काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले अशी माहिती या भेटीदरम्यान, किनारपट्टीवरील निवासी घरे, मत्स्यव्यवसाय संबंधित जागेचा वापर, पर्यटन व्यवसाय, घर दुरुस्ती, बांधणी आणि इतर संबंधित गोष्टींसाठी होणाऱ्या त्रासावर सखोल चर्चा झाली. मंत्री नितेश राणे यांनी विश्वास व्यक्त केला की, केंद्र आणि राज्य शासनाच्या या धोरणात्मक निर्णयामुळे किनारपट्टीवरील समुदायाला मोठा दिलासा मिळेल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांचा पाठपुरावा आहे. या महत्त्वपूर्ण विषयावर केंद्र स्तरावर खासदार श्री. नारायण राणे आणि राज्य शासनाकडे मंत्री नितेश राणे स्वतः पाठपुरावा करत आहेत. प्रशासनाने बजावलेल्या नोटिसांमुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी चिंता करू नये, लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री राणे यांनी यावेळी दिले अशी माहिती भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे म्हंटल आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या माजी नगरसेविका सौ. सेजल परब आणि उपशहर प्रमुख सन्मेश परब यांना भाजपमधील भावी वाटचालीस पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी बोनी फर्नांडिस, कुशल गिरकर, नामदेव केळुसकर, विवि फर्नांडिस, रुपेश प्रभु इतर उपस्थित होते.

