Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

'स्वामी कृपा क्लिनिकल लॅबोरेटरी'चे डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते उद्घाटन

'स्वामी कृपा क्लिनिकल लॅबोरेटरी'चे डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते उद्घाटन

लॅबोरेटरी सेवाभावी वृत्तीने कार्य करताना कमीत कमी शुल्कात मालवणात सेवा देईल :  सौं. माधुरी निखिल नेमळेकर


जुबेर खान | मालवण : आरोग्य सेवेत विश्वासार्हता, अचूकता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधत सौं. माधुरी निखिल नेमळेकर यांच्या 'स्वामी कृपा क्लिनिकल लॅबोरेटरी' चे मालवणमध्ये थाटात उद्घाटन झाले.

रामेश्वर कॉम्प्लेक्स समोर, भरड वायरी रोड, मालवण येथे असलेल्या या अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन सोमवार, दिनांक २१ जुलै रोजी जेष्ठ डॉक्टर सुभाष दिघे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. या नवीन उपक्रमामुळे मालवण आणि परिसरातील नागरिकांना उच्च दर्जाची रक्त तपासणी सुविधा माफक दरात उपलब्ध होणार आहे.

सौं. माधुरी निखिल नेमळेकर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले, स्वामी कृपा क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये आधुनिक मशीनरीच्या सहाय्याने रक्ताच्या तसेच अन्य तपासणी होणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक आणि जलद निदान करणे हे या प्रयोगशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही लॅबोरेटरी सेवाभावी वृत्तीने कार्य करेल आणि लाभार्थ्यांना कमीत कमी शुल्कात सेवा देण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः, ज्या व्यक्तींना प्रयोगशाळेत येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी घरी जाऊन रक्ताचे नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा अनेकांसाठी सोयीची ठरेल आणि आरोग्य तपासणी सर्वांसाठी सुलभ होईल, असे सौं. नेमळेकर यांनी नमूद केले. वृद्ध, आजारी व्यक्ती किंवा ज्यांना प्रवासाची अडचण आहे, अशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या उद्घाटन समारंभाला मालवणमधील अनेक नामांकित व्यक्ती आणि मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुभाष दिघे यांच्यासह डॉ. सचिन दिघे, डॉ. विद्याधर अमरे, मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, परशुराम पाटकर, सुधीर धुरी, जॉन नरोना, संदीप शेलटकर, विजय नेमळेकर, मयुरेश मेस्त्री, बाबा नेमळेकर, रामचंद्र फाटक, संदीप भोजने, अशोक नेमळेकर, पुरुषोत्तम भोजने, निखिल नेमळेकर, निधी नेमळेकर, महेश मेस्त्री, सुशांत तायशेट्ये, जनक चव्हाण, स्मृती कांदळगावाकर, मेघा मेस्त्री आदी व अन्य मान्यवरांनी सौं. माधुरी निखिल नेमळेकर यांना या नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्वामी कृपा क्लिनिकल लॅबोरेटरी मालवणच्या आरोग्य सेवेत एक मैलाचा दगड ठरेल आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

rapan bottom