Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण तालुका देवळी समाज उन्नती मंडळाचे कार्य आदर्शवत

मालवण तालुका देवळी समाज उन्नती मंडळाचे कार्य आदर्शवत

नूतन जिल्ह्याध्यक्ष राजन नाईक यांचे मालवण येथे प्रतिपादन

मालवण देवळी समाज विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न.

मालवण : मागील कित्येक वर्षे देवळी समाज उन्नती मंडळ मालवण यांच्यामार्फत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व इतरही विविध उपक्रम आयोजित केले जातात. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुका देवळी समाज बांधव चांगल्या प्रकारे काम करत असून त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद व आदर्शवत असेच आहे असे प्रतिपादन देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग ते नूतन अध्यक्ष राजन नाईक यांनी मालवण येथे केले.
देवळी समाज उन्नती मंडळ शाखा मालवण आयोजित तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजातील वधू वर सूचक मेळावा मालवण भरड येथील लीलांजली हॉल येथे नूतन अध्यक्ष राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष रमेश नरसुले, मालवण तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, विष्णू चौकेकर, डॉ.शरदचंद्र काळसेकर, सुधाकर पाटकर, विलास देवळी, बंटी कामतेकर, पूजा वेरलकर, राजेश कांदळगावकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मनोहर मालवणकर, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष राजन नाईक म्हणाले की मी एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ देवळी समाज बांधवांनी राजकारण बाजूला ठेवून मला जिल्हाध्यक्ष पद दिले. मागील काही वर्षात जिल्हा कार्यकारिणीत असलेली मरगळ दूर करून सर्व सहकारी सदस्यांना विश्वासात घेऊन आपण जिल्ह्यात देवळी समाज संघटना पुनर्बांधणी चालू केली असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका मंडळ स्थापन करून समाज बांधव संघटित करण्याचे काम आपण करणार आहोत. यासाठी सर्व सहकारी व समाज बांधवांनी आपल्याला सहकार्य करावे असे आवाहन राजन नाईक यांनी केले. पावसाळ्यानंतर आपण संपूर्ण जिल्ह्याचा एकत्र मेळावा आयोजित करणार असून याद्वारे जिल्ह्यातील राहिलेल्या समाज बांधवांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मालवण तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर व त्यांचे सहकारी यांना आपण धन्यवाद देत आहोत. कारण मागील 18 ते 20 वर्षे मालवण तालुका देवळी समाज मंडळ सातत्याने विद्यार्थी, वधू वर, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत त्यांची प्रेरणा जिल्ह्यातील व इतरही तालुक्यातील समाज बांधवांनी घ्यावी असे आवाहन राजन नाईक यांनी केले.
मोबाईलचे परिणाम व दुष्परिणाम याबाबत समाजबांधव डॉ. शरदचंद्र काळसेकर यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना योग्य मार्गदर्शन करून समाजाप्रती आपली सांघिक भावना ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना माजी जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर म्हणाले की शासन दरबारी असलेल्या ओबीसी 350 जातीत आपल्या देवळी जातीला शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. असे असताना जिल्ह्यातील आपले समाज बांधव अजूनही जातीच्या प्रवाहात येण्यास दजावत नाहीत यामुळे प्रत्येकांनी जात व समाजाप्रति आदर बाळगून आपल्या जातीचा अभिमान बाळगावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना नूतन जिल्हा उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर म्हणाले की मी मागील कित्येक वर्षे मालवण तालुका देवळी समाज उन्नती मंडळाच्या कार्यक्रमासाठी येत आहे. मालवण तालुक्यातील समाज बांधवांची एकजूट संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवत असून यापुढे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने मालवण तालुका समाज संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पिंगुळकर यांनी दिले. यावेळी 1ली ते 15वी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी व इतरही स्पर्धा परीक्षेत विशेष यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण तळवडेकर, सूत्रसंचालन रमेश चौकेकर तर आभार देविदास वेरलकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मधुसूदन परुळेकर, सुदेश मालवणकर, श्यामसुंदर पोईपकर, संतोष देऊलकर, वसंत वराडकर, दीपक किर्लोस्कर, हरिश्चंद्र तळवडेकर, उमेश श्रावणकर, सतीश बांदिवडेकर, न्हानु पेंडूरकर, अनिल तोंडवळकर, व इतर कार्यकारणी सदस्यांनी सहकार्य केले.

rapan bottom