Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बैलाच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू

बैलाच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू

निलेश जोशी | कुडाळ : मधली कुंभारवाडी येथील श्रीमती पुष्पलता रामचंद्र मांजरेकर (वय ७०) यांचा त्यांच्याच बैलाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक उदय मांजरेकर व टेम्पो व्यावसायिक पंढरी उर्फ बंडया मांजरेकर यांची ती आई होय. श्री मांजरेकर कुंटूबियांनी एक महिन्यापूर्वी बैल घेतला होता. मात्र तो बैल मारायला यायचा. त्यामुळे त्यांनी हा बैल विकण्याचा निर्णय घेतला होता. आज पहाटे या बैलाला नेण्यासाठी एक ईसम आला होता. घरापासून सुमारे १०० ते १५० मिटर अंतरावर टॉवरकडे टेम्पो लावण्यात आला. त्यांच्या ताब्यात बैल देण्यासाठी तिथपर्यंत बंडया मांजरेकर व त्यांची आई बैलाला घेऊन गेली होती. टेम्पो कडे पोहचल्यावर अचानक पुढे चाललेल्या आईवर बैलाने हल्ला केला. तिच्या मांडीत बैलाचे शिंग घुसल्याने ती गंभीर जखमी झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. तिला तात्काळ कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराला तीने प्रतिसाद दिला नाही. त्यातच तिचे निधन झाले.
त्यांची मुलगी सुरत येथून व अन्य नातलग मुंबईतून आल्यावर आज रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीमती मांजरेकर यांचे निधन झाल्याचे समजताच कुडाळ शहरासह अन्य भागातील नातलग नागरीक यांनी मांजरेकर कुटुंबियांच्या घरी येत सात्वन केले.

श्रीमती मांजरेकर यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुडाळ नगरपंचायतीचे कुंभारवाडी प्रभागाचे नगरसेवक उदय मांजरेकर व टेम्पो व्यावसायिक पंढरी उर्फ बंड्या मांजरेकर यांची ती आई होय. श्रीमती मांजरेकर कष्टाळू होत्या. घरचा भार त्याच वाहत असत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

rapan bottom