Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

लाचखोरीचे प्रकार थांबलेच पाहिजेत !

लाचखोरीचे प्रकार थांबलेच पाहिजेत !

शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे यांनी महसूलच्या कारभारावर व्यक्त तीव्र नाराजी

मालवण | प्रतिनिधी : महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल खाते बदनाम होत आहे.

लाच प्रकरणात जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचा समावेश दिसून येत असून त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव बदनाम होत आहे. शुक्रवारी लाच स्वीकारतांना सापडून आलेले मसुरे तलाठी जिल्ह्याबाहेरील आहेत. अधिकाऱ्यांनी नियमात राहून सेवा द्यावी. जनतेला वेठीस धरून सुरु असलेले हे लाचखोरीचे प्रकार थांबलेच पाहिजेत. असे सांगत महसूल विभागाच्या कारभाराबाबत शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पैसे घेऊन जर कामे होणार असतील तर सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळणार कसा? एका तलाठ्यावर झालेल्या कारवाई नंतर प्रशासनाने बोध घ्यावा. गोरगरीब जनता, सर्वसामान्य व्यक्तींची कामे तत्परतेने झाली पाहिजेत हाच प्राधान्यक्रम असावा. पैसे देणाऱ्यांच्या कामांना प्राधान्य हे आत बंदच. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी यात विशेष लक्ष द्यावे. जे नियमानुसार आहे ते झाले पाहिजे. गोरगरिबांना फेऱ्या आणि खास व्यक्तीना अग्रक्रम हे थांबलेच पाहिजे.

वारस तपास, येणे प्रकरण या सोबत नागरिकांना आवश्यक दाखले मिळताना काही ठिकाणी अनेकवेळा फेऱ्या माराव्या लागतात. याबाबत नागरिकांच्या तक्रारीही काही गावातून आहेत. कागदपत्रांची पूर्तता असेल तर असे होता नये. आज एक तलाठी यांच्यावर झालेल्या कारवाई नंतर तरी यापुढे कामात सुधारणा असेल असे आम्ही गृहीत धरतो.

मालवण तालुक्यात तसें न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन आमदार निलेश राणे यांच्याकडे संबंधित महसूल अधिकारी यांची तक्रार केली जाईल. असे राजा गावडे यांनी सांगितले.

rapan bottom