Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पाट हायस्कूलमध्ये पाणथळ शाळा चित्रकला स्पर्धा

पाट हायस्कूलमध्ये पाणथळ शाळा चित्रकला स्पर्धा

स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त सहभाग

निलेश जोशी | कुडाळ : महाराष्ट्र जैवविविधता बोर्ड व महाराष्ट्र जनुक कोश यांच्या वतीने, तसेच संत राऊळ महाराज कुडाळ कॉलेज यांच्या सहकार्याने पाट हायस्कूलमध्ये शनिवार दिनांक 19 जुलै रोजी पाणथळ जमीन जागृती करिता विशेष उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी संस्था सदस्य महेश ठाकूर, प्रविण सावंत, पाणथळ जागा अभ्यासक आणि मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, उपक्रम प्रमुख संदीप साळसकर हे उपस्थित होते.
यावेळी पाणथळ जमिनीचे महत्त्व व प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. महेश ठाकूर यांनी जलसुरक्षा या विषयाचे महत्त्व सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत दोनशे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यासाठी इयत्ता पाचवी-सहावी साठी 'जंगल विज्ञान', 'नदीचे चित्रण', 'सरोवराचे दृश्य' यावर चित्रण केले. तर इयत्ता सातवी आणि आठवीने 'पृथ्वी वाचवा', 'प्रदूषण मुक्त जग', 'झाडांचे महत्त्व आणि पक्षा प्राण्यांची घरे' या विषयावर चित्रण केले .सर्व स्पर्धकांनी काढलेली चित्रे पाहून संस्था संचालक आणि मुख्याध्यापक यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. संत राऊळ महाराज कुडाळ कॉलेज आणि महाराष्ट्र जैवविविधता यांच्या वतीने हा उपक्रम पाट हायस्कूल विद्यालयात यशस्वीपणे पार पाडला.

rapan bottom