Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

एसआरएम कॉलेजमध्ये एका दिव्यांग विद्यार्थिनीसाठी तळमजल्यावर तासिका

एसआरएम कॉलेजमध्ये एका दिव्यांग विद्यार्थिनीसाठी तळमजल्यावर तासिका

उद्योजक अजित राणे यांनी दिली व्हीलचेअर

कॉलेजचा राणे हॉस्पिटलसोबत आरोग्यसेवा करार

निलेश जोशी | कुडाळ : चालू शैक्षणिक वर्षांमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयाने एका विद्यार्थिनीसाठी पूर्ण वर्गाच्या सर्व तासिका तळमजल्यावर सुरू केल्या आहेत. दिव्यांग असल्यामुळे तिला मजले चढता येत नाहीत. अशा विद्यार्थिनीला शिक्षण घेण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये किंबहुना वरच्या मजल्यावर असणाऱ्या तासिका चुकू नयेत हा विचार करून सर्व तासिका तिच्यासाठी महाविद्यालयाने तळमजल्यावर एकाच वर्गात सुरु केल्या आहेत.
संत राऊळ महाराज महाविद्यालय होतकरू विद्यार्थ्यांच्या तसेच काही अध्ययनात अडचणी भासल्यास विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधून शिक्षणातील अडथळे दूर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योगपती अजित राणे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्हील चेअर दिलेली आहे. महाविद्यालयातील अशा काही दिव्यांग विद्यार्थ्यांना भविष्यातही उपयोग होऊ शकतो या हेतूने ही चाकाची खुर्ची त्यांनी दिलेली आहे. तसेच काही महत्त्वाच्या आरोग्यविषयक चाचण्या करून देण्यासाठी व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी उद्योजक अजित राणे यांचे बंधू डॉ.जी.टी.राणे यांच्या आरोग्य सेवेचाही लाभ होणार आहे.
महाविद्यालय आणि राणे हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्यामध्ये तसा सामंजस्य करार नुकताच करण्यात आलेला आहे. त्याचा फायदा भविष्यात विद्यार्थी व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांना होणार आहे . उद्योजक अजित राणे यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट देत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाह महेंद्र गवस, सेवा निवृत्त सनदी अधिकारी सुहास पाटील आणि मधुसुदन मर्तल, प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे , प्रा. डॉ.अनंत लोखंडे, प्रा.प्रशांत केरवडेकर आदी उपस्थित होते.

rapan bottom