Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ न्यायालयात जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा

कुडाळ न्यायालयात जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा

आरोग्य विषयक मार्गदर्शन

निलेश जोशी | कुडाळ : दिवाणी न्यायालय कुडाळ तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ व वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांसोबत आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते .
कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क-स्तर कुडाळ जी. ए . कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम गुरुवारी १७ जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी वकील सुरेंद्र मळगावकर यांनी जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन या विषयावर मार्गदर्शन केले . तसेच जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे औचित्य साधून डॉक्टर अनिकेत वजराटकर ,एम.एस (सर्जन ) यांचे उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. डॉक्टर वजराटकर यांनी त्यांच्या वैद्यकीय अनुभवाच्या आधारावर मूळव्याध व बद्धकोष्ठता या सामान्य व त्रासदायक आजारापासून बचाव करण्याचे प्रभावी उपाय सुचविले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. ए . कुलकर्णी दिवाणी न्यायाधीश क-स्तर कुडाळ यांनी जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिनाबाबत मार्गदर्शन केले व न्यायालयीन कर्मचारी व वकील वर्ग यांना आपापल्या तब्येतीची काळजी घेऊन न्यायालयीन कामकाजाची सेवा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिवाणी न्यायालयातील कनिष्ठ लिपिक एच.ए.कारेकर यांनी केले . या कार्यक्रमात वकील आर.डी.बिले , वकील विवेक मांडकुलकर, सहाय्यक सरकारी वकील श्रीमती अमृता मिरजे आणि 55 ते 60 न्यायालयीन कर्मचारी व वकील उपस्थित होते.

rapan bottom