Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

चिंदर सडेवाडी प्रशालेचा 'बांधावरची शाळा' उपक्रम

चिंदर सडेवाडी प्रशालेचा 'बांधावरची शाळा' उपक्रम

चिंदर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी 'बांधावरची शाळा' हा उपक्रम गोसावी वाडी येथील शेतमळ्यात अनुभवला.

प्रशालेतील बहुतांश मुले ही अन्नदाता शेतकरी कुटुंबातीलच आहेत. मात्र शाळेतील सर्व विध्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या एकत्रित सहभागातील हा अनुभव सर्वांसाठी अनोखा व आनंददाई असाच ठरला.

शाळा मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड तसेच पालकवर्ग यांच्या सोबतीने आनंदाने मुले शेतात जमा झाली.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी सौ. प्रीती कांबळी, सौ. करिष्मा कानविंदे, सौ सुहासिनी गोसावी, धनश्री गोसावी , मानसी गोसावी, सौ स्वरा घागरे सौ आराध्य कांबळी, शेतकरी श्री. जयेश गोसावी, संतोष गोसावी, श्री. शामराव गोसावी. सौ शैलेजा गोसावी व इतर पालक वर्ग यांच्या सहकार्यातून नेहमीचे प्रशालेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे केले जातात. त्याच धर्तीवर हा उपक्रम यशस्वी ठरला.

शेतकरी अन्न पिकावतात, आपले पोषण करतात. शेतकरी आपले मित्र आहेत. ही आपुलकीची, आदरांची भावना सर्वच मुलांमध्ये असावी. तसेच सर्व मुलांना प्रत्यक्ष शेतीबाबत माहितीही मिळावी या हेतूने विद्यार्थ्यांसोबत बांधावरची शाळा हा उपक्रम राबवला. शेतकऱ्यांशी संवाद साधतं माहिती जाणून घेण्यात आली. भात लावणी तसेच शेती बाबत प्रत्यक्ष अनुभव सर्वच मुलांनी एकत्रित अनुभवला. शाळा व्यवस्थापन समिती, शेतकरी या सर्वांच्या सहकार्यातून उपक्रम यशस्वी झाला.

rapan bottom