निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ लक्ष्मीवाडी येथील रहिवाशी मूळ जांभवडे (ता. कुडाळ ) येथील कुडाळ हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक, जिल्हा गौड सारस्वत समाजाचे अध्यक्ष, कुडाळ येथील प्रथितयश उद्योजक, अन्नपूर्णा इंटरप्रायझेसचे मालक चंद्रकांत उर्फ बापू अन्नाजी नाडकर्णी (76) यांचे बुधवारी रात्री दुःखद निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते.कुडाळ हायस्कूल मध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. एक यशस्वी व्यवसाईक म्हणून नांव कमविले.
त्यांच्या निधनाने समाजाने एक कर्तृत्ववान, प्रेमळ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व शिस्त व विद्यार्थी प्रिय शिक्षक गमावले आहे. बापू नाडकर्णी सर या नावाने ते कुडाळ मध्ये परीचीत होते. मनमिळाऊ अतिशय नम्र मनमोकळे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. व्यवसाय धंद्यात त्यांनी माणूसकी जपली. उदार स्वभाव, गरजूला मदत करणे, हा स्वभाव असल्याने अनेक माणसे त्यांनी जोडली.
सरांचे निधन झाल्याचे समजताच कुडाळ शहरातील विद्यार्थी, नातलग, हितचिंतक, व्यवसाईक यांनी त्यांच्या घरी येत अंत्यदर्शन घेतले व कुंटूबियांचे सात्वन केले. त्यांच्या जांभवडे या मूळ गांवात समजताच त्या गावातील ग्रामस्थ अंत्यदर्शनासाठी कुडाळात दाखल झाले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पश्चात पत्नी, दोन मूलगे, सूना, नातवंडे व अन्य मोठा परिवार आहे उद्योजक योगेश व निखील नाडकर्णी यांचे ते वडिल होत.

शिक्षक आणि उद्योजक चंद्रकांत नाडकर्णी यांचे निधन
