बॅ. नाथ पै सेवांगण यांचा विशेष उपक्रम : कलाशिक्षक श्री. बलराम सामंत, सौ. राखी अरदकर यांचे लाभणार मार्गदर्शन
मालवण : बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे विद्यार्थ्यांसाठी अंब्रेला पेंटिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी २:०० या वेळेत एस. एम. जोशी संकुल येथे ही कार्यशाळा होणार आहे.
इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी असून, सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतःची प्लेन रंगवायची छत्री घेऊन यावी, तसेच आपल्या शाळेतील कला शिक्षकांकडे नाव नोंदणी करावी. कोणतेही शुल्क नाही, मात्र प्रवेश मर्यादित आहे.
या साठी मार्गदर्शक कला शिक्षक म्हणून बलराम सामंत व राखी अरदकर करणार आहेत.
या कार्यशाळेसाठी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण चे अध्यक्ष देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर , कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर , कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांनी केले.
पावसात नुसतंच चिंब न होता, छत्रीला रंग देत पावसाचा खरा आनंद घ्या, आपल्या कल्पनांना रंगीत पंख लावा!
▪️अमित खोत | मालवण

