Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

गाबीत समाज वाघ कुटुंबियांसोबत

गाबीत समाज वाघ कुटुंबियांसोबत

समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या जितेश वाघ कुटुंबियांचे अखिल भारतीय गाबीत समाज अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन

जुबेर खान | मालवण : मालवण समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेला वादळी वाऱ्यात अपघात झाला. नौका पलटी होऊन तीन मच्छिमार समुद्रात फेकले गेले. यातील दोघेजण बचावले होते, मात्र जितेश वाघ हे बेपत्ता झाले. 8 जुलै ला सकाळी ही घटना घडली. 9 जुलै रोजी दुपारच्या सुमारास दांडी किनाऱ्यावर जितेश यांचा मृतदेह आढळून आला. या दुःखद घटनेने जितेश यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला., सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जितेश वाघ यांच्या आकस्मिक निधनाने वाघ कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या दुर्दैवी प्रसंगी अखिल भारतीय गाबीत समाजाचे अध्यक्ष माजी आमदार जीजी उपरकर आणि जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी जितेश यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगात गाबीत समाज वाघ कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे जीजी उपरकर यांनी सांगितले. "जितेश वाघ यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही गाबीत समाज बांधव म्हणून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. या प्रसंगी आम्ही त्यांना शक्य ती सर्व मदत करू," असे उपरकर यांनी नमूद केले.

जितेश वाघ यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी जीजी उपरकर यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मालवण येथे भेट देऊन मत्स्य विकास अधिकारी रवींद्र मालवणकर आणि सहायक मत्स्यव्यवसाय अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांच्याशी चर्चा केली. या भेटीदरम्यान, जितेश वाघ यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीची मागणी त्यांनी केली.

यावेळी, मत्स्य विकास अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी जितेश वाघ यांच्यासाठी मासेमारी संकट निवारण निधी आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अपघात गट या योजनांतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, या प्रस्तावांचा कार्यालयामार्फत सक्रिय पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाकडून लवकरात लवकर जितेश यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी कार्यालय प्रयत्नशील असल्याचे मालवणकर यांनी स्पष्ट केले.

मच्छिमारांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

याप्रसंगी, मत्स्य विकास अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मच्छिमारांना एक महत्त्वाचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अपघात गट या योजनेअंतर्गत प्रत्येक मच्छिमाराने आपले नाव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, मालवण येथे नोंदणी करून घ्यावी. या योजनेमुळे मच्छिमारांना नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या अशा दुर्दैवी घटनांमध्ये मोठा आधार मिळू शकतो. मच्छिमारांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन मालवणकर यांनी केले.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, गाबीत समाज जिल्हा संचालक अन्वय प्रभू, शहर प्रमुख बाबी जोगी, संमेश परब, आणि विजय उपरकर उपस्थित होते.

rapan bottom