लायन्स क्लब मालवण नूतन कार्यकारी मंडळ शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न
लायन्स क्लब एम.जी.एफ माजी मल्टीपल कौन्सिल चेअरमन द्वारका जालान यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : माणुसकी हा सेवाधर्म आहे. याच माणुसकीतून लायन्स क्लबचा जन्म झाला. लायन्स क्लब ही संस्था आपल्या कार्यातून समाजासाठी सेवाभावी वृत्तीने मदतकार्य करत असते. लायन्स सदस्यांच्या माध्यमातून हा सेवाभाव अखंडित सुरु राहील. असे प्रतिपादन लायन्स क्लबचे एम.जी.एफ व माजी मल्टीपल कौन्सिल चेअरमन द्वारका जालान यांनी मालवण येथे बोलताना केले.
लायन्स क्लब मालवणच्या सन २०२५- २०२६ नवीन कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा दैवज्ञ भवन मालवण येथे मुख्य अतिथी द्वारका जालान यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तत्पूर्वी मावळते अध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांनी त्यांच्या व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये लायन्स क्लबसाठी दान केलेल्या जागेत निर्माण केलेल्या लायन्स क्लब सेवा संकुलाचे उदघाटन द्वारका जालान यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर द्वारका जालान, लायन्स क्लबच्या नूतन अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण, सचिव सौ. मनाली दळवी व खजिनदार सौ. पूनम चव्हाण, माजी अध्यक्ष महेश अंधारी, माजी सचिव सौ. फॅनी फर्नांडीस, माजी खजिनदार सौ. पल्लवी खानोलकर आदी उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष अनुष्का चव्हाण यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देऊन द्वारका जालान यांच्या हस्ते पदभार सुपूर्द करण्यात करण्यात आला.
माजी अध्यक्ष महेश अंधारी यांनी गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेतला. तर फॅनी फर्नांडिस यांनी वर्षभरातील कार्य अहवाल वाचन केले. पल्लवी खानोलकर यांनी शंभर टक्के सदस्य फी जमा झाल्याने मालवण लायन्स क्लबला दोन पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगितले.

नूतन अध्यक्षा अनुष्का चव्हाण म्हणाल्या लायन्स क्लब ही केवळ सेवाभावी संस्था नसून समाजात निर्माण झालेला विश्वास आहे. हा विश्वास आम्ही आमच्या सेवेतून कायम जपणार. मालवणात 45 वर्षा पूर्वी जेष्ठ लायन्स सदस्यांनी लावलेले हे रोपटं वाढत असताना आम्ही त्यांचं विश्वासाने त्यांच्या मार्गदर्शनात काम करू. सर्वांच्या सहकार्याने वर्षभरात विविध उपक्रम राबविणार, असे सांगत लायन्स क्लब अध्यक्ष पदाचा हा बहुमान आईच्या आठवणीना समर्पित करते असे अनुष्का चव्हाण यांनी सांगत त्या भावुक झाल्या.

मनाली दळवी व पूनम चव्हाण यांनीही मनोगते व्यक्त करत वर्षभरात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण जनजगृती बाबत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच लायन्स क्लबचे नाव उंचावण्यासाठी सतत कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महेश अंधारी यांचा लायन्स क्लब परिवारातील विशेष योगदान बाबत सत्कार करण्यात आला.

- लायन्स क्लब मालवण नूतन संचालक मंडळ
अध्यक्ष-अनुष्का चव्हाण, माजी अध्यक्ष महेश अंधारी, सचिव मनाली दळवी, खजिनदार पुनम चव्हाण, प्रथम उपाध्यक्ष सचिन शारबिद्रे, द्वितीय उपाध्यक्षा स्वप्नाली नेरुरकर, तृतीय उपाध्यक्षा अंजली आचरेकर, सहसचिव उदय घाटवळ, सहखजिनदार विराज आचरेकर, टेल ट्रिस्टर जयश्री हडकर, टेमर-मिना घुर्ये, स्वच्छ भारत-डॉ. प्रिया रिवणकर, लायन क्रेस्ट-मिताली मोंडकर, मेंबरशिप चेअरमन स्नेहा जामसंडेकर, एल.सी.आय.एफ.एफ. चेअरमन-दिक्षा गावकर, पीआरओ मेघःश्याम शंकरदास, जीएसटी चेअरमन राधिका मोंडकर, जीएमटी चेअरमन वैशाली शंकरदास, जीएलटी चेअरमन डॉ. हरिष परुळेकर, कॅम्पेन १००-रुपा कांदळगावकर, अॅक्टिव्हिटी चेअरमन ऋग्वेदा धामापूरकर, हेल्थ अवेरनेस-नंदिनी गावकर, लिडरशीप मनिषा गावकर, साईट फर्स्ट डॉ. दर्शन खानोलकर, युथ प्रोग्राम-सहदेव बापार्डेकर, फंड रेजिग शाम नार्वेकर, डायबेटीक अवरनेस शांती पटेल, बुलेटीन एडिटर श्वेता यादव या असणार आहेत.
लायन्स परिवारातील संचालक मंडळ डॉ. शशिकांत झांटये, नाना साईल, दत्ताराम रेवणकर, रुजारिओ पिंटो, उमेश नेरुरकर, मुकेश बावकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, गणेश प्रभुलकर, अरविंद सराफ, मोहन पटेल, उमेश शिरोडकर, अवधूत चव्हाण, महेश कारेकर, विश्वास गांवकर यांसह जिल्ह्यातील जेष्ठ पदाधिकारी सुनिल सौदागर, अजित भणगे, केशव फाटक तसेच जिल्ह्यातील लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थित पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
सूत्रसंचालन सौ. स्नेहा जामसंडेकर व उदय घाटवळ यांनी केले. आभार मनाली दळवी यांनी मानले. यावेळी मालवण लायन्स क्लब तसेच जिल्ह्यातील इतर लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
▪️ अमित खोत, मालवण
……………

