शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व ग्रामस्थांच्या उपस्थितीतीत कामाला सुरुवात
आचरा : मुसळधार पाऊस व समुद्राला असलेल्या उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टीला बसत आहे. तळाशील किनारपट्टीचा बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये दहा ते पंधरा फूटाचे अंतर राहिले आहे. यामुळे तळाशील भागाला धोका निर्माण झाला होता. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टी भागाची पाहाणी करत किनाऱ्यास सुरक्षित करण्याची हमी दिली होती. दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ढासळत असलेल्या भुभागाला बंधारा घालण्याच्या कामाची सुरुवात ग्रामस्थांच्या उपस्थितीत केली.

तातडीने आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने बंधारा घालन्याचे काम हाती घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
तळाशील येथील किनारपट्टीला धोका निर्माण झाल्यानंतर दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांना संपर्क साधून माहिती दिली होती. निलेश राणे यांनी म्हणाले तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या किनारपट्टीचे संरक्षण आणि ग्रामस्थांची सुरक्षितता सर्वात महत्वाची असल्याने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वस्थ केले होते. आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनुसार राणेंच्या स्वखर्चातून दत्ता सामंत यांनी तातडीने बुधवार पासून तळाशील किनारपट्टीवर दगड पसरून किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी बंधारा घालण्याचे काम हाती घेऊन उपाययोजना सुरु केल्या होत्या.

कामाची सुरुवात करताना यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख राजा गावडे, शहर प्रमुख दीपक पाटकर, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, माजी सरपंच संजय केळुसकर, जयहरी कोचरेकर, पांडुरंग शेलटकर, संजय तारी, डॉ. प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, मुजफ्फर मुजावर, अभिजित सावंत, चंद्रकांत कदम, भुपाळ मालंडकर, राधाकृष्ण टिकम, प्रकाश बापर्डेकर, बबन रेवंडकर, गौरव मालंडकर, कुणाल पाटकर, झकास खवणेकर, स्नेहा कांदळगावकर,जान्हवी पराडकर,विनया रेवंडकर, प्राची बापार्डेकर, गौरवी पाटकर तसेच अन्य ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले की तोंडवळी तळाशील गावाचे रक्षण करण्यासाठी कुडाळ मालवणचे आमदार राणे कटीबद्ध आहेत. आताच्या युती शासनाच्या काळात सातशे तीस मीटरच्या बंधाऱ्यांची टेंडर प्रकीया मंजूर झालेली आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व महायुती च्या सरकार कडून 12 कोटी पेक्षा जास्त निधी या गावाला देण्यात आलेला आहे. आणखी या पुढचा
दिड किलोमीटर बंधारा मंजूर झालेला आहे. असे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी सांगत येणाऱ्या फुढील काळात या भागासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.

