Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

भाजप प्रवेश केलेल्या 'त्या' सात नगरसेवकांना अपात्र करावे

भाजप प्रवेश केलेल्या 'त्या' सात नगरसेवकांना अपात्र करावे

कुडाळ न.प.चे गटनेते मंदार शिरसाट यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांकडे केला अर्ज सादर

निलेश जोशी | कुडाळ : भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या कुडाळ नगर पंचायतच्या सात नगरसेवकांना अपात्र करावे अशी मागणी महाविकास आघाडीचे गटनेते मंदार शिरसाट यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या त्या सात नगरसेवकांनी स्वेच्छेने आघाडीचा गट सोडला. त्यामुळे त्या सात नगरसेवकांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता कायदा १९८६ चे कलम ३(१) नुसार अपात्र ठरवावे अशी मंदार शिरसाट यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रात आलेल्या भाजप प्रवेशाच्या बातम्या, त्या सात नगरसेवकांनी प्रवेशानंतर घेतलेली पत्रकार परिषद आणि त्याच्या बातम्या तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभेच्छांचे शहारत लावलेल्या बॅनरचे फोटो असे पुरावे जोडलेले आहेत.
कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक झाल्यावर शिवसेनेचे ७ आणि काँग्रेसचे दोन नगरसेवक मिळून ९ जणांनी कुडाळ महाविकास आघाडी या नावाने गट स्थापन केला. त्याला ११ फेब्रुवारी २०२२ रोजी राजपत्रामध्ये मान्यता देण्यात आली. या गटामध्ये गटनेता म्हणून मंदार शिरसाट तसेच किरण शिंदे, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, सई काळप, आफरीन करोल,अक्षता खटावकर या होत्या.
दरम्यान यापैकी सात जणांनी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ओरोस येथे भाजप पक्षात प्रवेश केला. तसेच त्यानंतर त्यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन 'विकासासाठी आम्ही भाजपात प्रवेश केल्याचे' प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. उबाठा शिवसेना व काँग्रेसच्या या सात नगरसेवकांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश हा स्वेच्छेने होता. त्यासाठी श्री. शिरसाट यांनी वर्तमानपत्रात आलेल्या भाजप प्रवेशाच्या बातम्या, त्या सात नगरसेवकांनी प्रवेशानंतर घेतलेली पत्रकार परिषद आणि त्याच्या बातम्या तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभेच्छांचे शहारत लावलेल्या बॅनरचे फोटो असे पुरावे जोडलेले आहेत.
दरम्यान उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी आपल्या लेटरहेडवर सभेचे निमंत्रण देऊन गटनेता बदलण्यासंदर्भात विषय ठेवला होता. मात्र या सात जणांनी स्वेच्छेने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते या गटामध्ये नसताना सभेचे निमंत्रण दिले. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता कायदा 1986 चे कलम ३ (१) प्रमाणे किरण शिंदे, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, सई काळप, आफरीन करोल, अक्षता खटावकर या सात नगरसेवकांना अपात्र करावे अशी मागणी घटनेता मंदार शिरसाट यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

rapan bottom